
मोपा: सध्या सगळीकडेच छावा या चित्रपटाची क्रेज आहे. विकी कौशल आणि अक्षय खन्ना यांच्या अभिनायाच्या चर्चा सर्वदूर आहेतच मात्र या चित्रपटात झळकलेले एक मराठमोळा चेहरा देखील पप्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय. या चित्रपटात रायाजीच्या भूमिकेत झळकलेला संतोष जुवेकर अलीकडेच गोव्यात आला होता. गोव्याच्या जनतेकडून मिळालेल्या प्रेमामुळे त्याला भरून आलं आणि त्याने गोव्यातील विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.
गोव्यातील विमानतळावर आल्या-आल्या विमानतळावरील स्टाफने त्याचे स्वागत केले. छावा चित्रपटाने कमावलेल्या यशाबद्दल सर्वानी मिळून संतोषला एक खास सरप्राईझ दिलं. यानंतर संतोषने व्हिडिओ रेकॉर्ड करत "सर्वांना तुम्ही छावा पाहिलात का"? असा प्रश्न विचारला असता सर्वजणं जोरात यावर 'हो' असं उत्तर देतायत आणि यासोबतच सिनेमात तुम्हाला बघून खूप आनंद झाला असंही म्हणतायत. संतोषने त्याच्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केलाय आणि हेच खरे यश असं म्हणत प्रेक्षकांच्या प्रेमाबद्दल त्यांचे आभार मानलेत.
मराठी चित्रपटांमधील आवडता चेहरा म्हणजेच संतोष जुवेकर छावामुळे बराच चर्चेत आलाय. वेगवेगळ्या ठिकाणी चित्रपटाबद्दल होणाऱ्या मुलाखतींमध्ये देखील तो आवर्जून उपस्थित राहतो.
गोव्यातील विमानतळावरील स्टारबक्स कर्मचाऱ्यांनी दिलेल्या या अनोख्या सरप्राईझमुळे संतोष भारीच खुश झालाय.
१४ फेब्रुवारीच्या दिवशी प्रदर्शित झालेला छावा अजूनही तेवढ्याच दमाने कमाई करतोय. छावाने आतापर्यंत ४०० कोटींचा आकडा पार केलाय आणि लवकरच ५०० कोटींच्या गटात एंट्री करण्याच्या तयारीत आहे. विकी कौशल, रश्मिका मंदाना आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित चित्रपटाला सिनेप्रेमींचे भरभरून प्रेम मिळत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.