Komal Singh In Goa: भोजपुरी अभिनेत्री कोमलचा गोव्यातला बोल्ड लूक व्हायरल; Photo, Video चर्चेत

Bhojpuri Actress Komal Singh In Goa: कोमल सिंग गोव्यात तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेच, पण तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केले आहे.
Bhojpuri Actress Komal Singh In Goa
Komal SinghKomal Singh Instagram
Published on
Updated on

पणजी: प्रसिद्ध भोजपुरी चित्रपट अभिनेत्री कोमल सिंगने नुकतेच गोव्यात सुट्टीचा आनंद घेतला. कोमलच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर आणि पावसाळी वातावरणात कोमलने तिच्या स्टायलिश आणि बोल्ड स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

कोमल सिंगने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन केलेल्या पोस्टमध्ये, ती समुद्रकिनाऱ्यावर चील करत गोव्यातील सुंदर वातावरणाचा आनंद घेत असताना दिसली. चाहत्यांनी तिच्या या फोटोला खूप लाईक करत कमेंटमध्ये तिचे कौतुक केले. कोमल सिंग गोव्यात तिच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेच, पण तिच्या फॅशन सेन्सने सर्वांना प्रभावित केले आहे.

Bhojpuri Actress Komal Singh In Goa
Goa Accident: ढवळी येथे अपघातात दोन म्हशी ठार; साळगाव - कळंगुट रोडवरील अपघातात एक गंभीर जखमी

कोमल सिंग भोजपुरी इंडस्ट्रीची अशी अभिनेत्री आहे जिचा साडीतील असो किंवा वेस्टर्न आउटफिट, कोमल प्रत्येक लूकमध्ये खूपच सुंदर दिसते. गोव्यातल्या फोटोमध्ये ती वेस्टर्न रिव्हिलिंग ड्रेसमध्ये दिसली. तिच्या फोटोने इंटरनेटवर धुमाकूळ घातला. कोमल, तू गोव्याला चार चाँद लावले, अशी कमेंट चाहत्यांनी कोमलचे फोटो पाहून केली. सोशल मीडियावरील कोमल सिंगची अॅक्टिव्हिटी नेहमीच चर्चेत असते आता गोवा ट्रिपने त्यात भर घातली आहे.

कोमलचे फोटो आणि व्हिडिओ पाहून असे वाटते की तिने गोव्यातील प्रत्येक क्षण पूर्णपणे जगला आहे. कोमल सिंगच्या गोवा ट्रिपची खास गोष्ट म्हणजे तिने तिच्या चाहत्यांना तिच्यासोबत या प्रवासाचा भाग बनवले. तिच्या स्टोरीज आणि इंस्टाग्रामवरील पोस्टद्वारे चाहत्यांना गोव्याच्या सौंदर्याचा आस्वाद दिला.

अभिनय आणि नृत्याने भोजपुरी इंडस्ट्रीत धुमाकूळ घालणाऱ्या कोमलने गोव्यातही आपला आपला जादू दाखवला. तिच्या सौंदर्याने पुन्हा एकदा सिद्ध केले की ती केवळ पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही एक स्टार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com