
मुंबई: प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांना घातक सिनेमा करताना झालेल्या दुखापतीनंतर त्यांना वीरु देवगण यांनी दिलेल्या सल्ल्याचा मोठा फायदा झाला होता. देवगण यांच्या सल्ल्यामुळे परेश रावल एक महिन्यातच बरे झाले होते. तर, डॉक्टरांनी रावल यांनी बरे होण्यासाठी दोन ते अडीच महिन्यांचा वेळ दिला होता. रावल यांनी स्वत:च एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे.
अभिनेते परेश रावल लल्लनटॉप या युट्युब चॅनलच्या मुलाखतीत बोलत होते. परेश रावल यांनी घातक सिनेमावेळी त्यांना झालेल्या दुखापतीचा किस्सा सांगितला. परेश रावल म्हणाले की, "मी हैद्राबाद येथे सिनेमाचे चित्रीकरण करत होतो. दरम्यान, माझ्या पत्नीला डिलिव्हरी निमित्ताने ब्रीज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, घातक सिनेमातील एका सीन करण्याची मला विनंती करण्यात आली. मी शुटींगसाठी आलो नाही असे त्यांना सांगितले तरी छोटासा सीन आहे लगेच होईल असे सांगितले त्यामुळे मला तो सीन करावा लागला."
"फिश मार्केटमध्ये अभिनेते राकेश पांडेला मी ओढतोय, असा सीन होता. मला देण्यात आलेले चप्पल घसरत होते. सीन करत असताना मी घसरलो आणि माझ्या गुडघ्याला मोठी दुखापत झाली. माझे हाड तुटले होते. यावेळी माझीच चूक होती", असे परेश रावल म्हणाले.
पण, "यावेळी डॅनी, टीनू आनंद यांनी मला नानावटी रुग्णालयात दाखल केले. माझी बायको रुग्णालयात होती तिची डिलिव्हरी होणार होती. घरात मी एकटाच कमवता आहे, आता कसं होणार याची चिंता सतावत होती. करिअरची काळजी वाटत होती", असे परेश रावल म्हणाले.
वीरु देवगण यांना धन्यवाद
"मी नानावटी रुग्णालयात होतो त्यावेळी वीरु देवगण कोणाला तरी भेटण्यासाठी आले होते तेव्हा त्यांनी माझी देखील भेट घेतली. त्यांनी मला काय झालंय असं विचारलं. त्यावेळी त्यांनी मला एक सल्ला दिला, सकाळी उठल्यानंतर पहिले मृत (लघवी) पे, सगळे फायटर लोक हे करतात. कधीच कोणता त्रास होणार नाही. फक्त तंबाखू, दारु काही घ्यायचे नाही, असे त्यांनी सांगितले. पण, युरीन (लघवी) प्यायचीच तर ती बिअर सारखी घेणार, असं मी ठरवलं होतं", असेही रावल म्हणाले.
"केवळ पंधरा दिवस मी हे केलं आणि जेव्हा माझा एक्सरे काढण्यात आला तेव्हा डॉक्टर देखील हैराण झाले होते. त्यांना देखील एक्सरेमध्ये बदल दिसून येत होता. जिथे मला बरे होण्यासाठी किंवा पुन्हा काम करण्यासाठी दोन ते अडीच महिने वेळ लागणार होता, ते मी एक महिन्यात बरा झालो", असे या मुलाखतीत परेश रावल यांनी सांगितले. याला शिवाम्बू (Shivambu) असं म्हणातात असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.