Goa Election 2022: स्वच्छ राजकारण करण्यासाठी तरुणांची पसंती 'गोवा फॉरवर्ड' ला

सरदेसाई (Vijay Sardesai) म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये नेहमीच गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना स्थान असते. या प्रकारे भाजपचा व्हायरस नष्ट करुया असे ते म्हणाले.
Vijay Sardesai
Vijay SardesaiDainik Gomantak

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने गोव्यासह चार राज्यांच्या विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. याच पाश्वभूमीवर गोव्यातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस वेगाने बदलू लागली आहेत. यातच आता राजकारण स्वच्छ करण्यासाठी तरुण स्वेच्छेने गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षामध्ये प्रवेश करीत आहेत,”असे विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी आज 21 जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. सरदेसाई म्हणाले की, गोवा फॉरवर्ड पक्षामध्ये नेहमीच गोव्यात बदल घडवून आणण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांना स्थान असते. या प्रकारे भाजपचा व्हायरस नष्ट करुया असे ते म्हणाले. (Young People Who Want To Make A Difference In Goa Are Joining The Goa Forward Party)

18 ते 20 वर्षे वयोगटातील तरुण गोवा फॉरवर्डच्या समर्थनार्थ आहेत. गोव्याच्या उन्नतीसाठी समाजसेवा करण्यासाठी ते राजकारणात येण्यास इच्छुक आहेत. “आमच्यात सहभागी झालेले तरुण चांगले पात्र आहेत. दोघांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे आणि काहींनी बीकॉम आणि बीबीए पूर्ण केले आहे,” असे सरदेसाई म्हणाले.

सरदेसाई पुढे म्हणाले की, युवक स्वेच्छेने गोवा फॉरवर्डमध्ये सामील होत आहेत. “हे तरुण स्वताहून आम्हाला पाठिंबा देत आहेत. काही राजकीय पक्ष मते गोळा करण्यासाठी ‘युथ इन पॉलिटिक्स’ पगारावर भरती करतात. पण, गोवा फॉरवर्डने त्यांची मने जिंकली आणि त्यांना गोव्याच्या उन्नतीसाठी एक व्यासपीठ दिले,”असे सरदेसाई पुढे म्हणाले.

राजकारणाचे नैतिक चारित्र्य बदलले पाहिजे. राजकारणाला गांभीर्याची गरज असते आणि ती गांभीर्याची ठिणगी या तरुणांमध्ये दिसून येते. गोवा फॉरवर्डला फक्त तीन जागा मिळाल्या आहेत पण पक्षाची कॉंग्रेससोबत युती आहे. “आम्ही गोव्याच्या चांगल्या भविष्यासाठी जागावाटपाचा त्याग केला आहे. गोवा फॉरवर्ड पक्ष काँग्रेससोबत युती करून गोव्याची उन्नती करू शकतो,” असे सरदेसाई म्हणाले.

ते म्हणाले की, भाजपने भ्रष्ट राजकारण्यांना तिकीट कसे जाहीर केले हे गोवावासीयांनी पाहिले आहे. “प्रशासनात बदल आवश्यक आहे. राजकारणातील भ्रष्टाचार, गुन्हेगारीकरण झपाट्याने वाढत आहे. राजकारणात इतरांना घरी पाठवण्यासाठी फॅमिली राजचा प्रचार केला जातो. हे बंद झाले पाहिजे,” असे सरदेसाई यांनी मत व्यक्त केले.

गोवा फॉरवर्ड मध्ये सामील झालेले तरुण, अरब खान यांनी घोषणा केली की त्यांनी स्वेच्छेने गोव्याचा कायापालट करण्यासाठी स्थानिक पक्षात सामील होण्याचा आणि पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. “ विजय सरदेसाई आणि त्यांच्या पक्षाने आम्हाला प्रेरणा दिली आहे. गोवा फॉरवर्डने आम्हाला अन्यायाविरुद्ध बोलण्यासाठी आवाज दिला आहे. ते एकमेव व्यक्ती आहेत ज्यांनी आम्हाला आमच्यासाठी बोलण्याची, आमच्या गोव्यासाठी बोलण्याची संधी दिली,” असे ते म्हणाले.

अरब म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत बेरोजगार तरुण एकतर रांगेत उभे असताना किंवा रस्त्यावर बसलेले दिसतात. ‘‘सध्याच्या सरकारने आम्हाला हेच देऊ केले आहे. राजकारणात येण्याची आमची इच्छा आहे आणि सरदेसाई हेच आम्हाला तरुणांना पुढे जाण्याची प्रेरणा देतात. आम्हाला बोलण्याची आणि आमचे भविष्य उज्ज्वल करण्याचे प्रोत्साहन देतात.’’ असे ते म्हणाले.

भाजपचे राजकारण त्यांच्या कुटुंबाभोवती फिरत असल्याचे अरब म्हणाले. "आम्ही कुठे जायच?" असा त्याने प्रश्न केला. “सरदेसाई यांनी यावर्षी हॅट्ट्रिक करावी अशी आमची इच्छा आहे,” असे अरब म्हणाला. फातोर्डा आणि गोव्यात घडलेल्या विकासाचे साक्षीदार असल्याने त्यांनी पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. सरदेसाई यांच्या उपस्थितीत केवळ फातोर्डामध्येच नव्हे तर संपूर्ण गोव्यात विकास घडला आहे, असे मी म्हणेन. भविष्यातही आम्ही असेच करू इच्छितो,” असे तो

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com