काणकोणात भाजप-कॉंग्रेसमधील बंडखोरी मत विभागणीस कारणीभूत ठरणार?

मातब्बरांपुढे मत विभागणीचे संकट
Congress and BJP
Congress and BJPDainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण: काणकोण मतदारसंघात बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर मतदार कोणाच्या‌ नशिबी राजयोग आणणार, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, भाजप व कॉंग्रेमधील बंडखोरी मत विभागणीस कारणीभूत ठरणार आहे. (Congress BJP Latest News)

Congress and BJP
कळंगुट येथील रेस्टॉरंट तोडफोड प्रकरणात 14 जणांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

काणकोण मतदारसंघात भाजप व कॉंग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीमुळे मतविभागणीला वाव मिळाला आहे. भाजपची उमेदवारी माजी मंत्री रमेश तवडकर यांना दिल्याने माजी उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून अधिकृत उमेदवाराविरूद्ध बंड पुकारले आहे. तर 2017च्या निवडणुकीत तवडकर यांनी बंडखोरी केल्याने पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याचा वचपा काढण्यासाठी माजी आमदार विजय पै खोत यांनीही बंडाचा झेंडा उभारला आहे. रमेश तवडकर यांना या निवडणुकीत पराजयाचे पाणी चाखायला लावणे, हे दोन्ही अपक्ष उमेदवारांचे एकमेव उद्दिष्ट आहे.

या बंडखोरीमुळे भाजपच्या (BJP) पारंपरिक मतांचे ध्रुवीकरण प्रक्रिया मतदारसंघात सुरू झाली आहे. प्रशांत पागी आरजीचे तर कनय पागी अपक्ष रिंगणात आहेत.त्यामुळे पागी समाजाच्या मतांचे काही प्रमाणात ध्रुवीकरण होणार आहे. मतदारसंघात अनुसूचित समाजाची सुमारे 9500 हजार मते आहेत तर बहुजन समाजाची 14 हजार मते आहेत. ओबीसी महासंघाने कॉंग्रेसचे (Congress) भंडारी यांना समर्थन दिले आहे. मात्र, ते बहुजनांना एकत्र आणण्यात किती यशस्वी होतील, हा प्रश्न आहे.

Congress and BJP
...तर भाजप विरोधी पक्षांनी गोव्यात एकत्र यावे: दिगंबर कामत

जनार्दन भंडारी यांना नवमतदारांचा पाठिंबा आहे. तृणमूलचे (TMC) महादेव देसाई यांनी कॉंग्रेसच्या मतांचे ध्रुवीकरण सुरू केले आहे.गोवा फॉरवर्डचे काणकोण मधील नेते प्रशांत नाईक भंडारी यांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहेत. मात्र ते कॉंग्रेसच्या उमेदवाराला किती मते मिळवून देणार, हे पहावे लागेल.

आठ नगरसेवक तवडकरांसोबत

भाजपचे (BJP) उमेदवार रमेश तवडकर यांना काणकोण पालिकेच्या बारापैकी आठ नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.मात्र या पैकी तीन नगरसेवक अल्पसंख्याक बहुल मतदार असलेल्या वार्डातील आहेत, त्यामुळे नगरसेवक भाजप उमेदवारामागे गेले तरी मतदार त्यांच्यामागे गेले नाहीत. काणकोण मतदारसंघामधील सहा पंचायतीपैकी पांच पंचायतीमध्ये इजिदोर फर्नांडिस समर्थक मंडळे कार्यरत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com