हाच का पर्रीकरांचा वारसा ?

मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला जाऊन आले. परंतु तेथे ते अमित शहा यांना भेटू शकले नाहीत.
Manohar Parrikar

Manohar Parrikar

Dainik Gomantak 

मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांचे पुत्र उत्पल पर्रीकर (Utpal Parrikar) यांच्या पणजीत निवडणूक लढवण्याच्या महत्त्वकांक्षेचे काय झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अलिकडेच ते पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यासाठी दिल्लीला (Delhi) जाऊन आले. परंतु तेथे ते अमित शहा (Amit Shah) यांना भेटू शकले नाहीत.

<div class="paragraphs"><p>Manohar Parrikar</p></div>
मुंख्यमंत्री प्रमोद सावंत वाराणसीमध्ये, पंतप्रधानांसोबत महत्वाची बैठक

त्यानंतर भाजपच्या (BJP) स्थानिक नेत्यांनीही या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहणे सोडून दिले आहे. याचे कारण पणजीतील उमेदवारी बाबूश मोन्सेरात यांनाच मिळेल, या निष्कर्षावर सारे आले आहेत. अमित शहा यांचाही कल तसाच असल्याची माहिती मिळते. या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवायचीच तर उत्पलना अपक्ष राहण्याशिवाय आता पर्याय नाही. परंतु तसे करणे म्हणजे मोठा धोका पत्करणे असे त्यांचे कुटुंबीय सांगतात. स्वतः अवधुत पर्रीकर यांनीही त्यांना सबुरीचा सल्ला दिला असल्याचे भाजपा नेते सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी १९ डिसेंबरला गोव्यात येतील. त्यावेळी ते उत्पलना निवडणूक न लढवण्याचा सल्ला देतील, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांची ६६व्या जयंतीनिमित्ताने मिरामार येथे उभारण्यात येत असलेल्या स्मृतिस्थळ या स्मारकावर राज्य सरकारच्यावतीने काल सकाळी साडेसहा वाजता आदरांजली वाहण्यात आली. यावेळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले.
अनेक लोकानी कार्यक्रमाला हजेरी लावली. मात्र, या समारंभात पर्रीकरांच्या कुटुंबियांपैकी कुणीही उपस्थित नव्हते. सरकार पर्रीकरांचा वारसा सांगत त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत कार्य करीत असल्याचा डांगोरा पिटत असताना पर्रीकरांच्या खऱ्याखुऱ्या वारसांना डावलण्यामागचे प्रायोजन काय? हे मात्र गुलदस्त्यातच आहे. या वेळेस पणजीचे (Panjim) आमदार बाबूश मोन्सेरात उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com