Goa Election: तृणमूलच्या 'युवा शक्ति कार्ड'ने गोमंतकीयांना काय मिळणार?

मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित व्हावा, आपलाच पक्ष विजयी व्हावा यासाठी प्रत्येक गोमंतकीयांना वेगवेगळे आमिष देत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमूल (TMC) पक्षाने 'युवा शक्ति कार्ड' ही नवीन योजना गोव्यातील जनतेसाठी आणली आहे.
New scheme to be launches by TMC

New scheme to be launches by TMC

Dainik Gomantak

Published on
Updated on

Goa Election: सध्या गोव्याच्या राजकारणात दररोज नवनवीन बदल होताना दिसत आहेत. प्रत्येक पक्षाने येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. मतदार आपल्या पक्षाकडे आकर्षित व्हावा, आपलाच पक्ष विजयी व्हावा यासाठी प्रत्येक गोमंतकीयांना वेगवेगळे आमिष देत आहेत. याच पार्श्वभूमीवर तृणमूल पक्षाने रविवारी 'युवा शक्ति कार्ड' ही नवीन योजना गोव्यातील जनतेसाठी आणली आहे.

<div class="paragraphs"><p>New scheme to be launches by TMC</p></div>
...आता गोवेकरांच्या हाती येणार “अजब गोव्याचे गजब राजकारण”

'युवा शक्ति कार्ड'ने गोमंतकीयांना काय मिळणार?

राजकारणात तरुणांनी यावे यासाठी प्रत्येक पक्ष तरुणांना आवाहन करत असतो. याचसाठी तृणमूलने 'युवा शक्ति कार्ड' ही योजना खास गोव्यातील जनतेसाठी आणली आहे. 'युवा शक्ति कार्ड' ही एक क्रेडिट कार्ड स्वरूपात असणार आहे. या कार्ड च्या माध्यमातून तरुण वर्गाला कर्ज उपलब्ध होणार आहे. जवळजवळ 20 लाखांपर्यंतच कर्ज या कार्डच्या माध्यमातून मिळणार असून याचा व्याजदर फक्त 4% टक्के इतकाच असणार आहे.

<div class="paragraphs"><p>New scheme to be launches by TMC</p></div>
गोव्यातील 15-18 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू

गोव्यातील 18 ते 45 या वयोगटातील सुमारे 7.5 लाख नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. आता सर्वच पक्षांमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी या सर्व योजना आता आणल्या जात आहेत की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com