फोंडा: गोव्यात सोमवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडले. राज्यातील 36 मतदारसंघात शांततेत मतदान झाले असले तरी नुवें, नावेली, फोंडा आणि डिचोली येथे गैरप्रकार घडले. (Goa Election News)
नुवें मतदारसंघात काँग्रेस (Congress) उमेदवार अॅलेक्सो सिक्वेरा आणि अपक्ष उमेदवार विल्फ्रेड बाबाशान डिसा यांच्या समर्थक गटांमध्ये वाद झाला. परिणामी फ्लाइंग स्क्वॉडला हस्तत्कक्षेप करून गर्दी पांगवावी लागली. मडगावमध्ये भाजप उमेदवार मनोहर बाबू अजगावकर आणि काँग्रेसचे दिगंबर कामत यांच्या समर्थकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. कामत मोठ्या संख्येने समर्थकांसह फिरत असल्याचा आरोप आजगावकर यांनी केला होता.
तृणमूल काँग्रेसच्या नावेलीच्या उमेदवार वालांका आलेमाव यांच्या बहिणींवर पैसे वाटपाचा आरोप करण्यात आला. वालांका यांच्या दोन बहिणी मतदारांना आमिष दाखविण्यासाठी पैसे वाटत असल्याचा आरोप झाल्यानंतर नावेलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकाऱ्यांना घेराव घातल्यानंतर पोलीसही घटनास्थळी दाखल झाले.
नावेलीत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) उमेदवार वालांका आलेमाव यांच्या बहिणींनी पैसे वाटल्याचा आरोप प्रतिमा कुतिन्हो आणि दिग्विजित चव्हाण या उमेदवारांनी केला होता. इतकंच नाही तर या उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी अधिकार्यांना घेरावही घालता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ ते घटनास्थळी दाखल झाले. आलेमाव बहिणींना बाहेर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) फोंड्याचे उमेदवार केतन भाटीकर यांच्याविरुद्ध फोंडा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. भाटीकर यांनी एका महिला व तरुणाबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. भाटीकर आरोप खोडून काढत म्हणाले, “माझी बदनामी करण्यासाठी प्रतिस्पर्ध्यांकडून हा कट रचण्यात आला आहे.”
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.