AAP: ...त्यामुळे जनता आम्हालाच निवडून देणार: केजरीवाल

आपच्या डोअर-टू-डोअर प्रचारामध्ये त्यांनी मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि सरकार निवडून आल्यास या सर्व समस्या सोडवू असे आश्वासन दिले.
अरविंद केजरीवाल
अरविंद केजरीवालDainik Gomantak
Published on
Updated on

AAP: 2022 च्या पाच राज्यांसाठी निवडणुका जाहीर झाल्यामुळे सगळीकडेच हालचालींना वेग आला आहे. गोव्यात तग धरू पाहत असणाऱ्या आप पक्षाने स्वत:च्या प्रचारात कमी ठेवलेली नाही. आप पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) निवडणुकीच्या प्रचारासाठी काल गोव्यात दाखल झाले आहेत. गोव्यासाठीचा व्हिजन प्लॅन सादर करण्यासाठी ते गोव्यात आले आहेत. यादरम्यान त्यांनी सांत आंद्रे (St. Andre Constituency), कुठ्ठाळी, शिरोडा मतदारसंघात आप नेते राहुल म्हांबरे आणि अमित पालेकर आणि महादेव नाईक यांच्यासोबत घरोघरी जात प्रचारही केला आहे.

अरविंद केजरीवाल
बेकायदेशीर खाण वाहतुकीचा बळी, 19 वर्षीय नर्सचा अपघाती मृत्यू

या प्रचारादरम्यान मतदारसंघातील नागरीकांनी त्यांचे खूप आदराने स्वागत केले. आपच्या डोअर-टू-डोअर प्रचारामध्ये त्यांनी मतदारसंघातील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. जर राज्यात या निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) आप पक्ष विजयी झाला तर, नागरिकांच्या या सर्व समस्यांचे पक्षातर्फे निराकरण होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. यावेळी त्यांनी विरोधी पक्ष कॉंग्रेस आणि भाजपवर निशाणाही साधला. या दोन्ही पक्षांनी जनतेसाठी नसून फक्त स्वत:च्या फायद्यासाठी काम केले असल्याचे ते म्हणाले.

अरविंद केजरीवाल
ATM Fraud: एटीएमच्या माध्यमातून तब्बल 2.5 कोटींचा गंडा

ते म्हणाले, 'राज्यातील युवा पिढी खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या समस्येला तोंड देत आहे. सरकारी नोकऱ्या उपलब्ध असून पण त्या या तरुणांना मिळत नाहीत. सरकारी नोकऱ्या फक्त ज्यांच्याकडे पैसे आहेत किंवा ज्यांचे बड्या अधिकाऱ्यांसोबत संबंध आहेत त्यानाच मिळत आहेत. काही करोड मिळवण्यासाठी नेते सतत पक्षबदल करत आहेत. अशा नेत्यांना जनता कंटाळली आहे; म्हणून नागरिक 'आप'ला एक संधी देऊ इच्छित आहेत. कारण मतदारांचा आपवर पूर्ण विश्वास आहे. मतदारांना खात्री आहे की आमचे सरकार निवडून आल्यावर आम्ही जनतेच्या सर्व समस्या सोडवू. पक्षातर्फे आम्ही जी काही आश्वासने दिली होती ती आम्ही सर्व पूर्ण केली आहेत. पक्षाच्या दिल्लीतील कामाबद्दल तरुण पिढीने कौतुक केले आहे. जनता भाजपच्या खोट्या आश्वासनांना कंटाळली आहे. त्यामुळे त्यांच्या हक्काचे सुख त्यांना आप पक्षातर्फेच मिळेल अशी आशा लोकांनी व्यक्त केली आहे. '

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com