ATM Fraud: आताच्या डिजिटल युगामुळे अनेक गोष्टी अगदी सहजरित्या करणे शक्य झाले आहे. यामुळे आपला वेळ त वाचतोच पण आपले कष्टही कमी होण्यात मदत होते. पूर्वी आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँकेत जाणे हाच एकमेव उपाय होता. पण आता डिजिटल तंत्रज्ञानात (Digital Technology) वाढ झाल्यामुळे स्थिर एटीएम (ATM) मशीनमार्फतच आपली अनेक कामे होऊ शकतात. अकाऊंट मधील बॅलेन्स तपासणे, पैसे काढणे, पैसे भरणे ही सगळे एकाच ठिकाणी होऊ शकते.
असे असले तरी या तंत्रज्ञानाचा तितकाच तोटाही आहे. अनेक हॅकर्सपासून आपले आर्थिक व्यवसाय सुरक्षित ठेवणे हे तितकेच कठीण काम आहे. एटीएम पिन न कळतादेखील आपले अनधिकृतरित्या पैसे काढल्याच्या अनेक घटना आजवर घडल्या आहेत. अशीच घटना गोव्यातील 43 एटीएमच्या बाबतीत घडली आहे. दोडामार्गमध्ये राहणाऱ्या सेक्युअर व्हेल्यू इंडिया लिमिटेड कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक नीलेश नाईक यांच्यासह 16 जणांनी सिक्युरिटी कोडच्या मदतीने गोव्यातील 43 एटीएम माशीनमधून तब्बल 2.5 कोटी रुपये काढून वेगवेगळ्या बँकांची आर्थिक फसवणूक केली आहे.
याबाबत पर्वरी (Porvorim) पोलिसांनी नीलेश नाईकसह त्या 16 आरोपींविरुद्ध पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. यासर्वांच्या टोळीमद्धे अजून कुणी सामील आहे का किंवा यांनी अजून कोणते गुन्हे केले आहेत का, याबद्दलचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.