फोंड्यातील भाजपच्या उमेदवारीचे रहस्य कायम

रवींच्या नावाबाबतही चर्चा, तर्कवितर्कांना उधाण, पंचायतीत संगीत खुर्चीचा खेळ सुरूच.
फोंड्यात भाजपची (BJP) उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण यायला लागले आहे.
फोंड्यात भाजपची (BJP) उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण यायला लागले आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत: फोंडा (Fonda) मतदारसंघातील राजकीय वातावरण सध्या तप्त होत चालले असून निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असल्यातरी स्पष्ट अशी दिशा दिसेनाशी झाली आहे. सध्या काँग्रेस (Congress) व भाजप (BJP) गोटात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण यायला लागले आहे. फोंड्याचे विद्यमान आमदार तथा माजी मुख्यमंत्री रवी नाईक (Ravi Naik) हेच फोंड्यातील भाजपचे उमेदवार अशीही चर्चा सध्या काही गटातून रंगविली जात आहेत. तर फोंड्याचे माजी नगराध्यक्ष विद्यमान नगरसेवक विश्वनाथ दळवी यांची उमेदवारी निश्चित असल्याचा दावा भाजप गोटातील काही कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. रवी हे सध्या काँग्रेसचे आमदार असले तरी ते पक्षापासून दूर गेल्यासारखे झाले आहेत. असे असले तरी फोंड्याच्या काँग्रेसच्या गटसमितीने सूचवलेल्या उमेदवाराच्या यादीत रवींचे नाव प्रथम क्रमांकावर असून राजेशवेरेकरांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचे समजते. पण उमेदवारी राजेशना जाणार असे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या गोटातून संकेत मिळताहेत. रवी काँग्रेसच्या उमेदवारीबाबत विशेष गंभीर नाही असे वाटत असले तरी शेवटच्या क्षणी ते कोणते कार्ड वापरतील हे सांगणे कठीण आहे.

सध्या त्यांचे एकला चलो रे सुरु असून कार्यकर्त्यांशी संपर्क साधणे त्यांनी सुरुच ठेवले आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत फोंड्याचा गड सर करण्याचा भाजपचा यावेळी निर्धार असल्यामुळे त्यांचा कल रवींकडे झुकू शकतो असा होरा व्यक्त केला जात आहे. पण या आमिषाला रवी किती प्रतिसाद देतात हे बघावे लागेल. दुसऱ्या बाजूला विश्वनाथ दळवी हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचे निकटवर्तीय म्हणून गणले जात असल्यामुळे तशीच त्यांची नुकतीच बाह्यविकास आराखड्याच्या उपसमितीवर सरकारतर्फे वर्णी लागल्यामुळे त्यांच्या पदरात भाजपची उमेदवारी पडण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

फोंड्यात भाजपची (BJP) उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण यायला लागले आहे.
Goa Congress: कळंगुट काँग्रेस सेवा दलाच्या प्रमुखपदी राजेंद्र कोरगांवकर

पण अजूनही भाजपच्या उमेदवारी बाबत रहस्य कायम असून शेवटी रहस्याची उकल काय होते हे पुढील महिन्याच्या सुरुवातीस कळू शकेल. पण भाजप काँग्रेस यादोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला असून काँग्रेसतर्फे राजेश वेरेकर हे घरोघरी फिरताना दिसत आहेत. काँग्रेस व गोवा फॉरवर्डची युती झाल्यास ही जागा काँग्रेसकडे जाणार हे निश्चित आहे. फोंड्यात गेल्या खेपेप्रमाणेच भाजप व काँग्रेसमध्ये लढत होण्याची शक्यता दिसत असली तरी मगोपक्ष या लढतीला तिसरा कोन बनू शकतो असे संकेतही व्यक्त होत आहे. डॉ. केतन भाटीकर हे मगोपचे उमेदवार म्हणून जवळजवळ नक्की झालेले आहे. सध्या फोंड्यातील नगरपालिकेत व कुर्टी खांडेपार पंचायत या एकमेव पंचायतीत भाजप मगोची युती झाल्यासारखे झाले आहे. नगरपालिकेत नगराध्यक्ष भाजपचा तर उपनगराध्यक्ष मगोपचा अशी परिस्थिती आहे. तर कुर्टी खांडेपार पंचायतीत सरपंच भाजपचा तर उपसरपंच मगोपचा असे चित्र दिसत आहे. पण गेल्या साडेचारवर्षांप्रमाणेच आता परत कुर्टी खांडेपार पंचायतीत संगीत खुर्चीचा खेळ सुरू झाला आहे.मगोपच्याच काही पंचांनी सरपंचाबरोबर आपल्या उपसरपंचावर अविश्वास ठराव आणल्यामुळे समीकरणे बदलण्याची शक्यता होत आहे. त्यात परत मगोपच्या कार्यकारिणी समितीचे एक सदस्य हे पक्षाविरूध्द तसेचमगोपच्या फोंड्यातील संभाव्य उमेदवाराविरूध्द बोलत असल्यामुळे या दुहींवर मगोपक्ष व डॉ. भाटीकर हे कशी मात करतात हे बघावे लागेल. मगोप व भाजपच्या युतीबाबतही संभ्रम व्यक्त होत आहे. यात तीन प्रमुख पक्षांच्या धुमचक्रीत आम आदमी, तृणमुल कॉग्रेस यांचे अस्तित्व लपल्यासारखे झाले आहे.

तृणमुल फोंड्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न करीत असला तरी त्यांचे प्रयत्न फोंड्याततरी म्हणावे तेवढे सफल झालेले दिसत नाही. फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार हे तृणमुलला फोंड्यात बळकट करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्या या प्रयत्नांना किती यश यते याचे उत्तर येत्या काही दिवसातच मिळणार आहे. आम आदमी पक्षाची उमेदवारी कोणाला हे स्पष्ट झाले नसून त्यावरही तर्कवितर्क सुरू झाले आहेत. पण फोंड्यात भाजप व कॉग्रेसची पारंपरिक मतदार असल्यामुळे या दोन पक्षात चुरशीची लढत होण्याचा संभव व्यक्त होत आहे. आता या दोन्हीपक्षांनी पसरविलेल्या जाळ्यातून मगोप कशी वाट काढतो हे बघावे लागेल. एकंदरीत फोंड्यातील राजकीय वातावरण रोचक झाले असले तरी भवितव्या बाबत फोंड्यातील मतदारांची अवस्था अंधारात चाचपडत चाललेल्या मुसाफिरासारखी झाली आहे. एवढे नक्की.

फोंड्यात भाजपची (BJP) उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत चर्चेला उधाण यायला लागले आहे.
BJP आणि MGP च्या युतीबाबत चर्चांना उधाण

रवींचा महिला मेळावा

महिला मेळावे म्हटले की हमखास माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांची आठवण येते. ते उपमुख्यमंत्री असताना 2001 साली त्यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केलेल्या पणजीतील मेळाव्याला जवळजवळ 35हजार महिला उपस्थित होत्या.तसेच 8 मार्च 2011 रोजी कुर्टी फोंडा येथील पशुसंवर्धन खात्याच्या मैदानावर झालेल्या महिला मेळाव्याला बारा हजार महिलांची गर्दी जमली होती. तसेच अनेक मेळावे त्यांनी आयोजित केले आहेत. आता निवडणूकीच्या तोंडावर रवी आपला हुकमी एक्का वापरण्याच्या तयारीला लागले असून येत्या रविवारी होणारा महिला मेळावा याचे द्योतक आहे. या महिला मेळावातर्फे रवी आपले शक्तीप्रदर्शन करू पाहत असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

रिव्होल्युशनरी गोवन्सची हवा

परवा फोंड्याच्या आगियार मैदानावर झालेल्या रिव्होल्युशनरी गोवन्सच्या जाहीरसभेला लोकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. जवळजवळ 5000 -6000 लोकांची उपस्थिती यासभेला लाभली होती. गोमंतकीयाची होणारी उपेक्षाचे हुंकार या सभेतील वक्त्याकडून प्रतिबिंबित होत असल्यामुळे त्याला प्रतिसाद मिळाला होता. पण फोंड्याचा या पक्षाचा उमेदवार निश्चित झाल्यामुळे फोंड्यातील सभेमुळे झालेली हवा ते कॅश करू शकतात की नाही हे सांगणे मात्र कठीण आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com