Goa BJP: कळंगुट येथील ‘टिटोज’चे मालक निवडणूक लढविण्यास इच्छुक

लोबोंच्या भाजपा सोडण्याने तेथील जागा रिक्त झालेल्या कळंगुट मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास रिकार्डो डिसोझा इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022Dainik Gomantak

Goa BJP: कळंगुट येथील जगप्रसिद्ध टिटोज ब्रँडचे मालक तसेच गेले वर्षभर राजकीय तसेच व्यावसायिक उद्योग समुहाच्या चर्चेत राहिलेले रिकार्डो डिसोझा (Ricardo D'Souza) यांनी येत्या 2022 च्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) उतरण्याचे जवळपास निश्चित केल्याचे खात्रीशीर वृत्त हाती लागले असून माजी मंत्री लोबोंच्या भाजपा सोडण्याने तेथील जागा रिक्त झालेल्या कळंगुट मतदारसंघातून (Calangute Constituency) निवडणूक लढविण्यास रिकार्डो इच्छुक असल्याची जोरदार चर्चा सध्या ऐकू येत आहे.

Goa Assembly Election 2022
Assembly Elections: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दिल्लीला रवाना

राज्यातील आतापर्यंतच्या सरकारांकडून व्यावसायिकदृष्ट्या दुखावलेल्या रिकार्डो डिसोझा यांनी दरम्यानच्या काळात एकतर गोवा सोडून जाण्याचे अथवा राजकीय क्षेत्रात उतरण्याचे याआधीच स्थानिक जनतेला संकेत दिले होते. तथापि, कळंगुट विधानसभा मतदारसंघातूनच विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी भाजपच्या (BJP) केद्रीय वरिष्ठांची मनधरणी करणाऱ्या डिसोझा यांना स्थानिक नेतृत्वाने तितकेसे गंभीरपणे न घेतल्याने निराश झालेल्या रिकार्डो यांनी शेवटचा उपाय म्हणून काँग्रेसचेही दरवाजे ठोठावून बघितल्याची माहिती समोर आली आहे.

कर्मधर्मसंयोगाने, भाजपचे दोनवेळचे आमदार तथा माजी मंत्री राहिलेल्या मायकल लोबो (Michael Lobo) यांनी विधानसभेच्या तोंडावर भाजपला शेवटचा गुडबाय केल्याने पक्षासमोर खऱ्याअर्थाने धर्मसंकट उभे राहिले असून लोबोंचा काटा काढण्यासाठी त्याच दर्जाचा उमेदवार शोधण्याची मोहीम सध्या कळंगुटमध्ये सुरू आहे.

माजी मंत्री लोबो यांचे एकेकाळचे जवळचे मित्र सुदेश मयेकर हेसुद्धा भाजपच्या तिकीटाचे दावेदार होते, परंतु खुर्चीची घाई असलेल्या मयेकर यांनीही सध्या आपली वेगळी राजकीय चूल मांडल्याने भाजपचे डोळे नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. तथापि, माजी मंत्री लोबो यांनी शेवटच्या क्षणी भाजपला दिलेल्या राजकीय धोक्याची परतफेड करण्यासाठी रिकार्डो डिसोझा हेच योग्य आणि एकमेव असे धनाढ्य उमेदवार मानले जातात. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढविण्याच्या घोषणेमुळ भाजपच्या गोटात सध्या आनंदाच्या उकळ्या फुटलेल्या आहेत.

Goa Assembly Election 2022
Goa Politics: मनोज परब यांना चोरून रेकॉर्डिंग करण्याची सवय

रिकार्डो यांना संधी देण्यासाठी भाजपचे प्रयत्न

रिकार्डो डिसोझा यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केलेली असली तरी त्यांचा डोळा भाजपच्याच तिकीटावर असल्याचेही स्पष्ट असल्याचे या भागातील भाजप जाणकारांचेच मत आहे. त्यामुळे सध्याच्या गोलमाल राजकीय स्थितीत माजी मंत्री मायकल लोबो यांना झुंज देणाऱ्या उमेदवारांमध्ये कळंगुटमध्ये रिकार्डोशिवाय दुसरा मातब्बर उमेदवार सध्या तरी नसल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची भाषा करणाऱ्या रिकार्डो डिसोझा ऊर्फ टिटोझ यांना भाजप आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती पुढे आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com