Goa Politics: मनोज परब यांना चोरून रेकॉर्डिंग करण्याची सवय

मनोज परब यांना असे चोरून रेकॉर्डिंग करण्याची वाईट सवय असून यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल आणि प्रशांत किशोर यांचेही असे रेकॉर्डिंग केल्याचे स्वतःच सांगितले होते; गोवा सुराज पार्टीचे अध्यक्ष ईनासियो वाझ यांचा पत्रकार परिषदेत आरोप
Manoj Parab Revolutionary Goans
Manoj Parab Revolutionary GoansDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: गोवा सुराज पार्टीचे अध्यक्ष ईनासियो वाझ यांनी रिव्होल्युशनरी गोवन्स या पक्षाशी आपल्या पक्षाने सर्व स्तरावरून फारकत घेतली असल्याचे सांगताना आरजीचे अध्यक्ष मनोज परब यांनी आपल्याकडे ऑडिओ रिकॉर्डिंग असल्याचं म्हटले आहे ते त्यांनी त्यात कुठलाही फेरफार न करता लोकांसाठी प्रसारित करावेत असे जाहीर आव्हान दिले. मनोज परब (Manoj Parab) यांना चोरून रेकॉर्डिंग करण्याची वाईट सवय असल्याची टीका त्यांनी केली. (Goa Suraj Party President Inacio Vaz allegations against Manoj Parab)

Manoj Parab Revolutionary Goans
BJP: विकास भाजपसाठी येत्या निवडणुकीत ठरणार गेमचेंजर

आज पक्षाचे संस्थापक फ्लोरियान लोबो यांच्या बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना वाझ यांनी मनोज परब यांना असे चोरून रेकॉर्डिंग करण्याची वाईट सवय असून यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि प्रशांत किशोर यांचेही असे रेकॉर्डिंग केल्याचे स्वतःच सांगितले होते. आपल्या रेकॉर्डिंगबद्दल परब बोलतात तो ऑडिओ बेन्टो डिसिल्वा यांनी माझ्या घरी येऊन रिकॉर्ड केला होता. त्यांच्याकडून रिकॉर्डिंग करण्यात येत असल्याबद्दल मी अनभिज्ञ होतो. तरीही हा संपूर्ण ऑडिओ त्यांनी जाहीर करावा, असे वाझ यांनी सांगितले.

बॅंक खात्यासंदर्भात केलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. यात खात्यामधून पैसे काढण्यासाठी अध्यक्षापेक्षा खजिनदारचे महत्व अधिक असते. बँक खाते खुले करतेवेळी हा अधिकार तीनपैकी दोघाजणांच्या सहमतीने पैसे काढण्यात येतात, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com