मांद्रेच्या विकासासाठी आम्हाला पुन्हा एकदा संधी द्या: लक्ष्मीकांत पार्सेकर

संपूर्ण तालुक्यातील बेरोजगारी नष्ट करण्याची पावले आपण उचलणार.
Laxmikant Parsekar
Laxmikant ParsekarDainik Gomantak
Published on
Updated on

हरमल: पेडणे तालुक्याच्‍या विशेषतः मांद्रे मतदारसंघाच्‍या(Mandre constituency) विकासासाठी अनेकविविध पर्याय व योजना उपलब्ध आहेत. त्या अंमलात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. पाच वर्षांच्या कारकीर्दीत लोकांत प्रचंड नाराजी आहे. त्‍यामुळे दूरदृष्टीचे व्हिजन असलेले अपक्ष उमेदवार निवडून येणे गरजेचे असून आपल्‍याला मतदारांनी पुन्हा एकदा संधी देण्याचे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा अपक्ष उमेदवार लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी केले.

Laxmikant Parsekar
मये मतदारसंघात भाजपची 'सत्वपरीक्षा'

या निवडणुकीत कदाचित भाजपतर्फे(BJP) उमेदवार असतो तर आपल्‍या नाकीनऊ आले असते. लोकांच्या हजारो प्रश्नांना जाब द्यावी लागली असती. जनतेच्या रोषास सामोरे जावे लागले असते, हे किमान टळले. बरेच कष्ट आहेत, मात्र फलनिष्पत्ती निश्चित असल्याचे पार्सेकर(Laxmikant Parsekar) यांनी सांगितले.

मांद्रे मतदारसंघातील पालये पंचायत क्षेत्रांत मधलावाडा भागात घरोघरी प्रचारांदरम्यान बोलत होते. मांद्रेच्या शाश्वत विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नरत होतो. मंत्री- मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात आपली कार्यपद्धती ही केवळ पेडणे(Pernem) तालुका व मांद्रे मतदारसंघ होता. चार प्रकल्पांच्या कामात आपण दिलेले योगदान शून्य करण्याचे काम गेल्या पाच वर्षात झाले आहे. त्यामुळेच आपण भाजपच्या उमेदवारीची मागणी करीत होतो. त्यातही आपणांस डावलले गेले. मोठा अन्याय केल्याने तालुक्याच्या विकासासाठी आपण कठोर परंतु खंबीर निर्णय घेतल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

आगामी काळात पाणी, वीज समस्या सुटेलच शिवाय ज्वलंत बेरोजगारीचा(Unemployment) प्रश्न युवा वर्गाच्या हितासाठी विश्वासात घेऊनच सोडविणे भाग आहे. इलेक्ट्रॉनिक सिटी(Electronic City) प्रकल्प बेरोजगारासाठी उपयुक्त असून संपूर्ण तालुक्यातील बेरोजगारी नष्ट करण्यासाठी आपण पावले उचलणार आहोत, असे पार्सेकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com