अर्थव्यवस्थेसाठी खाणी सुरू होणे महत्त्वाचे

काँग्रेसचे निरीक्षक चिदंबरम : संसाधने शोधण्याची समस्या नाही
Chidambaram
ChidambaramDainik Gomanatak
Published on
Updated on

पणजी: राज्याची अर्थव्यवस्था कोलमडली असून ती सुधारायची असेल, तर कायदेशीर खाणकाम सुरू करण्यापासून पर्याय नाही. काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर राज्यातील खाणी सुरू करण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. गोव्यासाठी(Goa) संसाधने शोधण्याची समस्या नसून तर त्याच्या वाटपाची आहे. काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्यात ठळकपणे नमूद केलेले सर्व मुद्दे पुढील पाच वर्षात साध्य करता येतील, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले.(Goa election 2022 news)

काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, काँग्रेस प्रदश अध्यक्ष गिरीश चोडणकर, माजी केंद्रीय कायदामंत्री ॲड. रमाकांत खलप, काँग्रेस मीडिया प्रभारी अलका लांबा, प्रकाश राठोड, अविनाश तावारीस, एम. के. शेख, अमरनाथ पणजीकर आदी उपस्थित होते.

Chidambaram
Goa Assembly Election: बाबू केपेचा 'गड' राखणार का ?

चिदंबरम(chidambaram) पुढे म्हणाले, की गोव्यासाठी (Goa) संसाधने शोधण्याची समस्या नसून समस्या आहे ती संसाधनांच्या वाटपाची. सरकारची (Goverment) स्वतःची संसाधने, केंद्र सरकारच्या महसुलातील वाटा आणि केंद्र सरकारचे अनुदान असे राज्याचा अर्थसंकल्पात तीन मार्ग आहेत. निधीचा स्रोत ही कधीच समस्या नव्हती, परंतु समस्या निधी वाटपाची होती.

राज्याची संसाधने कशी वाढू शकतात याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, गोवा आयटी आणि फार्मास्युटिकल केंद्र झाले तर संसाधने वाढतील. आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या (supreme-court ) आदेशानुसार शाश्वत कायदेशीर खाणकाम सुरू करू शकतो. परंतु समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे असा पुनरुच्चार करून गोव्यातील खाणकाम पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले.

रमाकांत खलप म्हणाले, 2035 सालचा दृष्टीक्षेप लक्षात घेऊन जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. हा जाहीरनामा गोव्यातील लोकांच्या 500 अनोख्या सूचना घेऊन तयार करण्यात आला आहे. आमचा विश्वास आहे की प्रत्येकाचा फायदा झाला पाहिजे आणि न्याय मिळाला पाहिज म्हणून या जाहीरनाम्यात ‘न्याय’ कार्यक्रम असे संबोधण्यात आले आहे. या जाहीरनाम्यात नमूद केलेल्या आश्‍वासनांचा दर सहा महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे.

भाजपचा पराभव झाला तर सर्व समाजकल्याणकारी योजना बंद होतील, अशा चुकीच्या माहितीला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहन गिरीश चोडणकर यांनी केले. भाजप लोकांच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेसला किती जागा मिळतील या प्रश्‍नावर उत्तर देताना चोडणकर यांनी सांगितले की, भाजपप्रमाणे आमच्याकडे भविष्य ओळखण्याची मशिन नाही. मात्र, लोकांना यावेळी बदल हवा आहे. त्यानुसार आतापर्यंत काँग्रेसने केलेल्या सर्वेनुसार सुमारे 24 ते 26 जागा मिळतील. भाजपचा या निवडणुकी धुव्वा उडणार यात मात्र शंका नाही. गोव्यात आलेले राजकीय पक्ष मतांची विभागाणी करून भाजपला लाभ मिळवून देतील यासाठी मतांची विभागणी होऊ नये म्हणून भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसलाच मतदान करण्याचा निर्धार लोकांनी केला आहे.

‘पक्षांतरे करणाऱ्यांचा पराभव करा’

पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना पी. चिदंबरम म्हणाले की, गोव्यात पक्षांतराचा रोग थांबला पाहिजे आणि पोटनिवडणुकीत पक्षांतर करणाऱ्यांचा पराभव करण्याचे लोकांनी ठरवले तरच ते शक्य आहे. लोकांनी अशा राजकारण्यांना पराभूत केले पाहिजे. उमेदवारांकडून निवडून आल्यावर पक्षांतर न करण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे हे पक्षासाठी मर्यादित संरक्षण आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com