Goa Election: रोजगारासाठी खास योजना राबवणार

माविन गुदिन्‍हो : यापूर्वीच्‍या सातही निवडणुकांपेक्षा भव्‍य प्रतिसाद
Mauvin Godinho
Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्‍को: आपला प्रचार कसा चालला आहे आणि प्रतिसाद कसा मिळतोय?अतिशय उत्तम असा प्रतिसाद मतदारांकडून मिळत आहे. याआधीच्या सातही निवडणुकांमध्ये असा प्रतिसाद कधीच अनुभवास आला नव्‍हता. सध्या येथे भाजपची (BJP) लाट असल्यासारखे चित्र दिसत आहे. घरोघरी प्रचारावेळी आरत्यांनी स्वागत केले जात आहे. मी मतदारसंघातील लोकांना वेळोवेळी आपत्कालीनप्रसंगी मदत करीत आलो आहे. त्याची पोचपावती मला दिली जात असावी. कोविड संकटावेळी लोकांना सातत्याने मदत केली आहे.

इस्पितळांमध्ये कंपनी सामाजिक जबाबदारी या योजनेच्या साहाय्याने उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत. चक्रीवादळावेळीही अशीच मदत केली. लाडली लक्ष्मी, गृहआधार, मुख्यमंत्री रोजगार योजना यासारख्या योजना लोकांच्या दारापर्यंत पोचविण्यासाठी मी नेहमीच पुढाकार घेतला आहे.

Mauvin Godinho
डिचोली आदर्श मतदारसंघ बनविण्याचे ‘व्हिजन’: डॉ. चंद्रकांत शेट्ये

आपण अनेकांच्या समस्या सोडवण्यासाठी तत्परतेने पुढे येता, त्याविषयी सांगा.

होय, मी नेहमी लोकांबरोबर असतो. अनेकांच्या घरांमध्ये कौटुंबिक समस्या निर्माण होतात. काहींच्या वैयक्तिक समस्या असतात. अशा सर्वांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच मदत करत असतो. कोणा गरजू व्यक्तीच्या मुलीचे लग्न असल्यास त्यांना आर्थिक मदतही मी केली आहे.

Mauvin Godinho
'गोव्‍यात भाजपचे रोपटे लावून जपले, तरीही माझ्‍यावर अन्‍याय'

मतदारसंघात कोणती विकासकामे केली आहेत?

जवळजवळ 90% विकासकामे पूर्ण केली आहेत. कॉटेज हॉस्पिटल होते त्याचा दर्जा वाढवून जिल्हा इस्पितळ बनविले आहे. वाडे तलाव जेथे गणेश विसर्जन केले जात असते तो तलाव प्रदुषित होऊन तेथे गलिच्छता निर्माण झाली होती. त्याचे उत्तम सौंदर्यीकरण केले आहे. तेथे उद्यान तयार केले आहे व कार्यक्रम करण्यासाठी सुविधा तयार केली आहे. एक जॉगर्स पार्क उभारले आहे. तेथे फूड कोर्ट, तेथील चालण्याच्या सुविधेचे रुंदीकरण केले आहे. बोगमाळो येथे नवीन मैदान तयार केले आहे. विमानतळाजवळून या भागातील पहिला उड्डाणपूल उभारला आहे.

युवकांसाठी काय योजना आहेत?

बेरोगजारीवर प्रभावी उपाय काढण्याची माझी एक कल्पना आहे. मात्र सध्या मी उघड करणार नाही.तुम्ही वाहतूकमंत्री म्हणून काम केले आहे. गोव्यातील रस्त्यांबाबत सदैव तक्रारी आहेत. त्याविषयी सांगा.रस्त्यांची जबाबदारी माझी नाही. एक गोष्ट खरी आहे की आमच्या मंत्र्यांनी अपेक्षेप्रमाणे काम केलेले नाही. मात्र पुढे चांगले रस्ते देण्याचा आमचा प्रयत्न असेल.

Mauvin Godinho
निवडून आल्‍यावर दिव्या राणे प्राधान्यांन 'हे' काम करणार

दाबोळी मतदारसंघातील युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी खास योजना राबविणार असल्याचे वाहतूकमंत्री तथा भाजपचे दाबोळी मतदारसंघाचे उमेदवार माविन गुदिन्हो यांनी ‘गोमन्तक’ (Gomantak) ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. मात्र तूर्तास या योजनेचे नेमके स्वरूप आपण सांगू इच्छित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com