Goa Election 2022: डबल इंजिनची डिलिव्हरी शून्य

काँग्रेस नेते सचिन पायलट यांची भाजपवर टीका
Sachin Pilot
Sachin PilotDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आणि इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु ते अर्थव्यवस्था हाताळण्यात तसेच कोविडच्या काळातही ते अयशस्वी ठरले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्यात असलेले भाजपचे डबल इंजिन डिलिव्हरी शून्य आहे अशी टीका काँग्रेस नेते आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी आज केली.

काँग्रेसने पुढील पाच वर्षासाठी तसेच 2015 सालपर्यंतचा व्हिजन डोक्युमेंट आराखडा लोकांसमोर ठेवला आहे. या जाहीरनाम्यात जी वचने दिली आहेत ती सत्यात काँग्रेस आणणार आहे. लोकांनाही कळून चुकले आहे हे डबल इंजिन सरकार फक्त आश्‍वासनेच देणारे आहे. त्यामुळे काँग्रेसला पुन्हा एकदा बहुमत देऊन संधी देण्याचे लोकांनी ठरविले आहे, असल्याचे पायलट म्हणाले. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, अमरनाथ पणजीकर, सुनील कवठणकर, नौशाद चौधरी, स्वाती केरकर उपस्थित होते. तृणमूल काँग्रेसच्या माजी नेत्या स्वाती केरकर यांनी काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला.

Sachin Pilot
मोदी सरकारमध्ये आलेल्या या 10 मोठ्या स्टार्टअपने गाठला यशाचा एक नवा पल्ला

अनेक राजकीय पक्ष ही विधानसभा निवडणूक (Assembly elections) लढवत आहेत. मात्र, काँग्रेसच्या मतांमध्ये फूट पाडण्याचा त्यांचा हेतू फळाला येणार नाही. गोव्यात आम्ही स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहोत. आमचे सरकार पारदर्शक असेल आणि दिलेली वचने आम्ही पूर्ण करणार आहे. काँग्रेस पक्ष सर्व प्रश्नांवर आणि राज्याच्या भवितव्यासाठी गोव्यातील जनतेच्या पाठीशी उभा आहे.

तरुणांना संधी हव्या आहेत आणि वाढी बरोबर त्यांना शाश्वत विकास हवा आहे, असे ते म्हणाले. उत्तराखंड आणि पंजाबमध्ये काँग्रेस (Congress) पक्षाला प्रचंड बहुमत मिळेल. गोव्यातही बहुमत मिळेल कारण काँग्रेसने लोकांची मागणी पूर्ण करून नवीन चेहरे निवडणुकीत उतरविले आहेत. लोक आम्हाला पाठिंबा देत आहेत, खाणकाम पुन्हा सुरू करण्यात भाजप (BJP)अपयशी आले आहे. गोव्यातील लोकांना डबल इंजिनचा फायदा झाला नाही. ते निर्णायक कृती करू शकलेले नाहीत. त्यांची डिलिवरी शून्य आहे, असे त्यांनी सांगितले.

Sachin Pilot
गोवा बनणार स्टार्ट अपचे विश्‍वकेंद्र

काँग्रेसमधून तृणमूल काँग्रेसमध्ये गेलेल्या स्वाती केरकर यांनी घरवापसी केली आहे. काँग्रेसने त्यांना प्रवेश दिल्यानंतर बोलताना त्या म्हणाल्या की, तृणमूल काँग्रेसमध्ये त्यांना स्वातंत्र्य नव्हते, म्हणून त्यांनी राजीनामा दिला आणि काँग्रेस पक्षात परत आल्या. मला आयपॅकच्या आदेशांवर काम करावे लागत होते. जे मला मान्य नव्हते. केरकर यांचे उदाहरण देत अमरनाथ पणजीकर यांनी गोव्याच्या भल्यासाठी काँग्रेसच्या माजी समर्थकांना पुन्हा पक्षात येण्याचे आवाहन केले.

Sachin Pilot
Goa Assembly Election: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गोवा दौऱ्यावर

खाणकाम स्थगित केल्यामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. राज्यात वाढलेली बरोजगारीवर तोडगा काढण्यास भाजपला गेल्या दहा वर्षात शक्य झाले नाही. भांडवलदार मित्रांना मदत करण्यासाठी तीन रेषीय प्रकल्प राबविण्याचा भाजपचा मानस आहे तो काँग्रेस पूर्ण होऊ देणार नाही. - सचिन पायलट, काँग्रेस नेते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.