भाजपचा सत्तास्थापनेचा दावा लांबणीवर, नेमकं कारण काय?

चारही राज्यात एकाचवेळी शपथविधीसाठी भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे प्रयत्न
BJP Government Formation
BJP Government FormationDainik Gomantak

नवी दिल्ली : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला 5 राज्यांपैकी 4 राज्यांमध्ये विजय मिळाला आहे. मात्र अजून एकाही राज्यात भाजपने सत्तास्थापनेचा दावा केलेला नाही. होळीनंतर 18 मार्च किंवा त्यानंतर विजय मिळालेल्या चार राज्यांमध्ये भाजप सरकार स्थापन करणार आहे, अशी माहिती आहे. होळीनंतरच उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरचे मुख्यमंत्री निवडले जातील. चारही राज्यांमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते उपस्थित राहू शकतील अशा प्रकारे शपथविधी समारंभ आयोजित करण्यासाठी समन्वय साधला जात आहे.

BJP Government Formation
गोव्यात मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अनिश्चितता

उत्तराखंडमध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान आणि पियुष गोयल यांच्या देखरेखीसाठी आमदारांची बैठक होळीच्या दुसऱ्या दिवशी बोलावण्यात आली आहे. 20 मार्च रोजी उत्तराखंडमध्ये शपथविधी सोहळा होऊ शकतो. मणिपूरमधील नवनिर्वाचित आमदार आज सोमवारी शपथ घेत आहेत. गोव्यातील आमदारांना मंगळवारी 15 मार्च रोजी शपथ दिली जाईल. या दोन्ही राज्यांतील विधानसभा विसर्जित करण्यात आल्या आहेत. विधानसभेचे हंगामी सभापती आमदारांना शपथ देतील. गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमधील मुख्यमंत्र्यांबाबतची अनिश्चितता अजूनही विविध कारणांमुळे कायम आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री (CM) कोण याबाबत खलबतं सुरु आहेत. तसंच यावेळी विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले होते, परंतु त्यांचाही पराभव झाल्याने मणिपुरात आणखी एका नेत्याचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची माहिती आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) हे देखील दुसऱ्या टर्मसाठी परतणार होते पण विश्वजीत राणेंसह अनेकांचा असलेला विरोध पाहता पक्ष नेमका काय निर्णय घेतं याची सर्वांनाच उत्सुकता आहे.

BJP Government Formation
सावर्डेचे आमदार गणेश गावकर विधानसभेचे हंगामी सभापती

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असल्याची माहिती आहे. योगी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करत असल्याचं बोललं जात आहे. भाजपने (BJP) उद्या मंगळवारी सकाळी 9:30 वाजता संसदीय समितीची बैठक बोलावली आहे, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाच्या खासदारांना संबोधित करतील. असं असलं तरीही भाजपचा सत्ता स्थापन करण्याचा कार्यक्रम होळीपर्यंत पुढे गेल्याची माहिती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com