पणजी: सत्ताधारी भाजपला काही मतदारसंघांमध्ये उमेदवार जाहीर करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याची प्रचिती बुधवारी आली. उमेदवारी यादी निश्चित करण्यासाठी दिल्लीत पक्ष कार्यालयात पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा (j.P Nadda) यांच्या उपस्थितीत दिवसभर चर्चा झाली. (Milind Naik name in discussion for candidature)
या चर्चेत गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), केंद्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, सरचिटणीस सतीश धोंड, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी भाग घेतला. बैठकीत 40 पैकी 34 नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते. यात वास्कोच्या मिलिंद नाईक (Milind Naik) यांचे नावही चर्चेत आले.
डिचोली, मुरगाव, सांगे, कुंभारजुवे, पणजी, कुठ्ठाळी, नुवें, बाणावली या मतदारसंघाबाबत पुन्हा चर्चा होणे अपेक्षित आहे. दिवसभराच्या चर्चेनंतरही अंतिम यादी काल जाहीर झालीच नाही. यादी आज गुरुवारी जाहीर होण्याची शक्यता भाजपा सुत्रांनी दिली.
उत्तर गोवा : पणजीतून मोन्सेरात, मांद्रेत दयानंद सोपटे
मांद्रे : दयानंद सोपटे
पेडणे : प्रवीण आर्लेकर
थिवी : नीलकंठ हळर्णकर
म्हापसा : जोशुआ डिसोझा
शिवोली : दयानंद मांद्रेकर
साळगाव : जयेश साळगावकर
कळंगुट : गुरुदास शिरोडकर
पर्वरी : रोहन खंवटे
हळदोना : ग्लेन टिकलो
पणजी : बाबूश मोन्सेरात
ताळगाव : जेनिफर मोन्सेरात
सांताक्रुज : आग्नेल डिकुन्हा
सांत आंद्रे : फ्रान्सिस सिल्व्हेरा
कुंभारजुवे : जेनिता मडकईकर
मये : प्रेमेन्द्र शेठ
साखळी : डॉ.प्रमोद सावंत
पर्ये : डॉ.दिव्या राणे
वाळपई : विश्वजीत राणे
दक्षिण गोवा : काणकोणमधून तवडकर, मडगावातून बाबू
मडकई : ॲड.विद्या गावडे
प्रियोळ : गोविंद गावडे
फोंडा : रवी नाईक
शिरोडा : सुभाष शिरोडकर
मुरगाव : मिलिंद नाईक
वास्को : दाजी साळकर
दाबोळी : माविन गुदिन्हो
फातोर्डा : दामू नाईक
मडगाव : बाबू आजगावकर
वेळ्ळी : सावियो रॉड्रिग्स
कुंकळ्ळी : क्लफायास डायस
केपे : चंद्रकांत कवळेकर
कुडचडे : निलेश काब्राल
सावर्डे : गणेश गावकर
सांगे : सुभाष फळदेसाई
काणकोण : रमेश तवडकर
( या नावांचा भाजपच्या संभाव्य यादीत समावेश आहे.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.