'भाजपची उमेदवारी आपल्यालाच अन् विजयही आपलाच'

मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (Dayanand Sopte) यांनी गावडेवाडा मोरजी येथील घरो घरी प्रचार केल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना 18 रोजी केले.
Mandre MLA Dayanand Sopte
Mandre MLA Dayanand SopteDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मांद्रे मतदार संघाची भाजपची उमेदवारी हि आपल्यालाच मिळणार आणि आपण कार्यकर्त्यांच्या बळावर विजयी होणार असा विश्वास व्यक्त करून सध्या विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरत असल्याने वेगवेगळ्या  माध्यमातून आपल्या विरोधात अफवा पसरववल्या जात  आहे, त्यांच्यावर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी गावडेवाडा मोरजी येथील घरो घरी प्रचार केल्यानंतर स्थानिक पत्रकारांकडे बोलताना 18 रोजी केले.

आमदार दयानंद सोपटे यांनी पुढे बोलताना आपली उमेदवारी हि निच्छित झाल्यानेच आपल्याला पक्ष्श्रेस्ठीने प्रचार करण्याची सुचना केली त्याच्या सूचनेनुसार आता पर्यंत मतदार संघातील 80 टक्के घरोघरी जावून नागरिकांच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहे आणि या समस्या पुढील पाच वर्षात सोडवल्या जातील असे सोपटे म्हणाले.

मतदार संघात कोणत्या समस्या प्रामुख्याने जाणवतात असा प्रश्न पत्रकाराने विचारला असता, बेरोजगारी आणि पाण्याची समस्या नागरिक मांडत असतात, असे आमदार सोपटे यांनी सांगून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यामुळे तुये येथे नवीन पाणी प्रकल्पाचे भूमिपूजन करता आले नाही. निवडणुकीनंतर आणि भाजपच्या सरकार आल्यावर लगेच नवीन पाणी प्रकल्प उभारला जाईल असे सांगून बेरोजगारी संबधी सरकारी नोकऱ्या बरोबरच तुये येथे आयटी प्रकल्पात नवीन प्रकल्प उभारून चांगल्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आणि हि समस्या केवळ भाजपा सरकारच सोडवणार असल्याचे आमदार दयानंद सोपटे यांनी सांगितले.

अफवावर विश्वास ठेवू नका

मान्द्रेची उमेदवारी साठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकांत पार्सेकर (Laxmikant Parsekar) आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यात रस्सीखेच आहे, उमेदवारी विषयी सध्या जी अफवा पसरवली जाते त्यात विरोधकांचा हात असल्याचा दावा आमदार दयानंद सोपटे यांनी केला. आमदार दयानंद सोपटे यांनी यावेळी आपण मांद्रे मतदार संघात पाच वर्षाच्या कारकिर्दीत कोण कोणती कामे व योजना राबवल्या त्यांची माहिती दिली.

Mandre MLA Dayanand Sopte
Goa Election: भाजपची पहिली उमेदवार यादी 16 जानेवारीला जाहीर होणार?

आमदार सोपटे यांचा असाही उपक्रम

आमदार दयानंद सोपटे यांनी मतदार संघातील केरी, पालये, हरमल, मांद्रे (Mandre) ,मोरजी, आगरवाडा, पार्से तुये आणि विर्नोडा या 9 पंचायत क्षेत्रातील हिंदुच्या घरामध्ये भगवतगीता वितरीत करण्याचा उपक्रम राबवण्यात आला. आपली संस्कृती परंपरा टिकवून ठेवण्यासाठी हा उपक्रम असल्याचे आमदार सोपटे म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com