संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची गरज: निरुपा नाईक

कांपाल येथील ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’च्या दालनात गोव्यातील प्रतिथयश चित्रकार - शिल्पकारांचे एक कलाप्रदर्शन सुरू आहे
संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची गरज: निरुपा नाईक

संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची गरज: निरुपा नाईक

Dainik Gomantak 

Published on
Updated on

कांपाल येथील ‘सूर्यकिरण हेरिटेज हॉटेल’च्या दालनात गोव्यातील (Goa) प्रतिथयश चित्रकार - शिल्पकारांचे एक कलाप्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे नाव आहे, ‘स्पसेस ॲण्ड डायमेन्शनस’. निरुपा नाईक, सोनिया रॉड्रीगीज, राजेश चोडणकर, श्रीपाद गुरव आणि गोपाल कुडासकर या कलाकारांच्या कलाकृती तिथे मांडलेल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर नाव असलेल्या या कलाकारांनी आपल्या कलाकृतीबद्दलच्या आणि त्याच्या निर्मितीमागच्या भावना आजपासून आपल्यासमोर मांडायचे ठरवले आहे. पहिल्या दिवशी आपल्या कलाकृतीबद्दल आपल्याला सांगत आहेत, निरुपा नाईक.

निरुपा नाईक यांना राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय पातळीवर चित्रकलेसाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यांची चित्रे देश - विदेशातल्या चित्रकला (Painting) प्रदर्शनांमधून मांडली गेली आहेत.‘संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची भरपूर गरज आहे. मला वाटते, कामाबद्दलची चिकाटी, सामान्यातून असामान्य शोधण्याची वृत्ती, सौंदर्यदृष्टी माझ्यात आहे. जीवनाविषयी मला प्रेमही आहे. मला थोडीशी जी सफलता आजपर्यंत मिळाली आहे ती मला वाटते त्यामुळेच आहे. पेंटिंगमधून आपण आपल्या सुप्त इच्छा, आकांक्षा, विचार, जीवनात दीर्घकाळ घेतलेले अनुभव लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो. एखादे पेंटिंग, स्वतःसाठी केले तरी ते बघण्यार्यापर्यंत पोहोचेल असा प्रयत्न हवा.

म्हणजे आपल्या भावभावना आणि त्यातून स्वतःला पेंटिंग(Painting) बनवताना मिळालेला आनंद प्रेक्षकाला ते बघताना मिळाला तरच ते पेंटिंग सफल झाले असे मला वाटेल. कलाकाराच्या (Artist) रचनेचा उद्देश केवळ जनसाधारणाना प्रसन्न करणे हा नसतो तर तो स्वत:चे अंतरंग अभिव्यक्त करणे हा असतो. एखाद्या कवितेवर जर चित्र सादर करायचे असेल तर कवितेतील भावभावना चित्रकाराच्या मनःपटलावर उमटणे गरजेचे असेल. म्हणजे कवीच्या आत्म्याची भाषा चित्रकाराच्या आत्म्यापर्यंत भिडून ती भाषा कलाकृतीच्या रूपाने बाहेर येईल. वाचणाऱ्यांच्या अंतरात्म्याला शब्दांची अनुभूती आली तरच ते खरा आस्वाद घेऊ शकतात. त्यानंतर जो आनंद मिळतो तो अवर्णनीय असतो.

<div class="paragraphs"><p>संगीतासाठी जसा रियाज आवश्यक आहे तसेच पेंटिंगमध्येही सरावाची गरज: निरुपा नाईक</p></div>
Christmas Special: गोव्यातील डेझर्टमध्ये वापरला जातो 'हा' पदार्थ

कविता लहानपणापासूनच माझा आवडता विषय त्यामुळे माझे कवितांचे वाचन खूप झाले. अर्थपूर्ण शब्दरचना, भावना, प्रतिकात्मकता, लय, अलंकार, यमक यामुळे कवितेला साज चढतो आणि ती मनाला भिडते. पेंटिंग (Painting) म्हणजे आकार, रंगरेषाद्वारे तयार झालेली अंतरात्म्याची भाषा तर कविता ही शब्दांची भाषा. कविता वाचता वाचता सहज मनात चित्र उभे राहत असे. मी ते साकार करायचे ठरवले आणि गोव्याच्या (Goa) काही कवितांवर मी ही पेंटिग्स केली. हे सगळे प्रसिद्ध गोव्याचे चित्रकार- बाकीबाब बोरकर, मनोहरराय सरदेसाय, माधव बोरकर, शंकर रामाणी, संजीव वेरेकर, मुकेश थळी, रमेश वेळुसकर, परेश कामत, राधा भावे, नागेश करमली, माधवी सरदेसाई यांच्या या कविता ‘स्पेसेस अ‍ॅण्ड डायमेंशन्स’ प्रदर्शनात माझी चित्रे बनून आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com