Election Campaign: दाबोळी मतदार संघात विधानसभा निवडणुकीचे वारे पसरू लागले आहे. राष्ट्रीय पक्षांनी प्रचारात बाजी मारण्यात पुढाकार घेतला आहे. गोवा राष्ट्रवादी काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री जुझे फिलिप डिसोझा (Juze Philip D'Souza) यांनी दाबोळीत आपल्या कार्यकर्त्यांसह घरोघरी गाठी भेटी बरोबर कोपरा बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) यंदा कोणता पक्ष बाजी मारणार हे लवकर राज्यात आचारसहिता लावल्यानंतर स्पष्ट दिसेल. राज्यात सर्वत्र सध्या सर्व पक्षांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. यात राष्ट्रीय पक्षाबरोबर प्रादेशिक पक्षांनी आपल्या कार्यकर्त्यांसह प्रचाराचा धूम धडाका सुरू ठेवला आहे. मुरगाव तालुक्यातील दाबोळी मतदार संघात सध्या राष्ट्रीय पक्षाच्या संभाव्य उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू ठेवला आहे. गोवा राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदारांच्या गाठीभेटी बरोबर सायंकाळी विविध ठिकाणी कोपरा बैठका घेत आहे. दाबोळीत, नवेवाडे, वाडे, आल्त दाभोळी, चिखली, आशय डोंगरी, उत्तर डोंगरी, परिसरात जुझे फिलिप डिसोझा यांनी घरोघरी प्रचारा बरोबर काही ठिकाणी कोपरा बैठका घेतल्या आहे. दाबोळी जुझे फिलिप डिसोझा यांना सध्या मतदारांचा वाढता प्रतिसाद लाभत आहे.
दाबोळीतील नवेवाडे, वाडे भाग पूर्वी वास्को मतदार संघात असताना, जुझे फिलिप डिसोझा यांना तेथून बऱ्यापैकी बढत मिळत होती. यामुळे जुझे यांना या भागात बऱ्यापैकी प्रतिसाद लाभत आहे. दाबोळी जुझे फिलिप डिसोझा यांने प्रचारात बऱ्यापैकी मजल मारली असल्याने, इतर पक्षाने सुद्धा आपला प्रसार जोमाने सुरू केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.