'आश्वासनांची पूर्तता करण्याची क्षमता अन् ताकद केवळ भारतीय जनता पक्षामध्येच' !

आश्र्वासनांती पुर्तता करण्याची ताकद व क्षमता केवळ भारतीय जनता पक्षाला आहे असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी फातोर्डा येथील जाहीर सभेत सांगितले.
J. P. Nadda
J. P. NaddaDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी: निवडणुकांच्या काळात अनेक राष्ट्रीय, स्थानिक पक्ष आश्र्वासने देत असतात, त्यामुळे मतदार गोंधळलेला असतो. त्यासाठी मतदारांनी न गोंधळता आश्र्वासने देण्याऱ्या सर्व पक्षांच्या गत कामाचा आढावा घ्यावा, त्यावर विचार करावा व नंतरच आपले मत पक्के करावे. याचा सारासार विचार केला तर आश्र्वासनांती पुर्तता करण्याची ताकद व क्षमता केवळ भारतीय जनता पक्षाला आहे असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J. P. Nadda) यांनी फातोर्डा (Fatorda) येथील जाहीर सभेत सांगितले. (JP Nadda Said That Only The Bharatiya Janata Party Has The Capacity To Deliver On Its Promises)

भारतीय जनता पक्षाने (BJP) ज्या योजना व उपक्रम तयार केले त्याची पुर्तता करुन दाखवली. देशाची सेवा करताना आपल्या पक्षाने कधीच जात- धर्माचा विचार केला नाही. आमचा पक्ष हा समाजातील सर्व थरातील लोकांना एकत्र घेऊन जाणार पक्ष असुन बाकीचे एकतर वंशवादी, संधीसाधू किंवा परिवारवादी असल्याचे ते म्हणाले, आपला पक्ष केवळ राष्ट्रवादी, राष्ट्रीयत्वाची भावनाची कदर करणारा पक्ष असल्याचे नड्डा म्हणाले.

J. P. Nadda
Goa Election: नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपचे संकल्प पत्र जाहीर

तसेच त्यांनी विरोधी पक्षांवर चौफेर टिका करताना सांगितले की तृणमुल कॉग्रेसने बंगालची दुर्दैशा करुन ठेवली आहे. या राज्यात गुन्ह्यात वाढ झाली आहे. येथे मानवी तस्करी व बालकांवरील अन्याय वाढलेले आहेत. शिवाय नोंद न झालेले गुन्ह्यातही वाढ झालेली आहे. कॉंग्रेस पक्ष तर भाऊ बहिणीचा पक्ष बनलेला आहे. निवडणुका व्हायच्याच आहे व एव्हानाच कॉंग्रेस पक्षांमध्ये मुख्यमंत्री बनण्याची चढाओढ सुरु झाल्याचेही नड्डा म्हणाले.

भाजपने स्वच्छता अभियान, आयुष्यमान भारत अभियान सुरु केले. गॅस कनेक्शने दिली कित्येक योजना सुरु केल्या पण कधीही या योजनांच्या लाभधारकांचा जात- धर्म पाहिला नाही. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची यावेळी आठवण करताना त्यांनी माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांची यावेळी आठवण करताना त्यांनी सांगितले की, त्यांनी सुवर्ण गोवा बनविण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तत्पर असल्याचे त्यानी सांगितले.

J. P. Nadda
Goa Election: 'भाजप सरकार राज्यातील घोटाळ्यांचा बाप'

गोव्यासाठी भाजपने सामाजीक, आर्थिक, साधन सुविधा उभारण्याच्या अनेक योजना आंखल्या असुन त्याची पुर्तता करण्यासाठी पक्ष तत्पर आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत केंद्र सरकारने गोव्याला 400 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे असेही नड्डा यानी सांगितले.

मोपा विमानतळामुळे (Mopa Airport) गोव्याचा सर्वांगीण विकास होणार आहे. गृहआधार योजनेमुळे महिलांचे सशक्तीकरण होणार आहे. लाडली लक्ष्मी, दयानंद सामाजीक सुरक्षा योजनांचा लाखो गोमंतकीयांना लाभ होत आहे. क्रिडा साधन सुविधा, आरोग्य सुविधांमध्ये वाढ करताना भाजप सरकारने 19 वरुन 59 प्राथमिक आरोग्य केंद्र वाढवली आहेत. 23 आयुर्वेदीक व 2 होमिओपॅथी इस्पितळांची स्थापना गोव्यात होणार आहे.. गोवा देशातील प्रमुख पर्यटन स्थळ भाजप सरकारमुळे झाल्याचे असे ते म्हणाले. दहा वर्षापुर्वी गोवा माफिया राज्य होते पण आता गुन्हेगार व गुन्हेगारी मुक्त झाले आहे. लोकांची सेवा करुन पुढे जाणार भारतीय जनता पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.

J. P. Nadda
Goa Election:...म्हणून लहान पक्षांना मत देऊ नका: अशोक चव्हाण

फातोर्डाचे भाजपचे उमेदवार दामू नाईक हे मेहनती, लोकांच्या सुख दुख्खात सहभागी होणारे, समाजाची चिंता करणारे, बांधिलकी जपणारे आहे, त्याच्याकडे दूरदृष्टी, दिशा व विचार आहे. त्यामुळे निवडणुकीत त्याना निवडून देण्याचे आबाहनही त्यानी केले. आपण कधीही पक्षाची प्रतारणा केली नाही म्हणुनच पक्षाने आपल्याला उमेदवारी दिल्याचे दामू नाईक यानी सांगितले. फातोर्डातील विकास कामांचे श्रेय जरी विद्यमान घेत असले तरी ही सर्व विकास कामे आपल्या आमदारकीच्या कारकिर्दीत सुरु झाल्याचे नाईक यानी सांगितले. त्यासाठी चर्चा करण्याचे जाहीर आव्हान त्यानी विद्यमान आमदाराला दिले. चर्चेच्या वेळी सर्व वस्तुस्थिती व आंकडेवारी सादर करणार असल्याचे त्याने सांगितले. भाजपच्या या जाहीर सभेला केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, कारवारच्या आमदार रुपाली नाईक, भाजपचे राज्य प्रवक्ते उर्फान मुल्ला, कुडतरीचे भाजप उमेदवार एन्थनी बार्बोजा, नगरसेवक कामिल बार्रेटो, सदानंद नाईक, मिलाग्रीन गोम्स, बबिता नाईक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com