Goa Election: 'भाजप सरकार राज्यातील घोटाळ्यांचा बाप'

गोव्यातील भाजपचे सरकार घोटाळ्यांचे बाप आहेत, अशी घणाघाती टीका दिल्लीचे आरोग्यमंत्री व ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांनी केली आहे.
Satyendra Kumar Jain
Satyendra Kumar JainDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यातील लोक भाजपवर (BJP) तीव्र नाराज असून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार (Goverment) घोटाळ्यांचे जनक आहे, अशी घणाघाती टीका दिल्लीचे आरोग्यमंत्री व ‘आप’चे नेते सत्येंद्र जैन यांनी केली. भाजपने घोटाळ्यातील कलंकित मंत्र्यांनाच उमेदवारी देऊन पुन्हा संधी दिली आहे,असेही ते सोमवारी सावर्डेत आयोजित सभेत म्हणाले. जैन यांनी आप उमेदवार अनिल गांवकर व गॅब्रिएल फर्नांडिस यांच्या प्रचारार्थ सावर्डे आणि कुडचडेत जाहीर सभा घेतल्या.

Satyendra Kumar Jain
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ताळगावात पोलिस गस्तीमध्ये वाढ

"गोवेकरानी भाजपला 15 वर्षे दिली, पण त्यांनी घोटाळ्यांव्यतिरिक्त काय केले. भाजपाने वीज, पाणी, वैद्यकीय सुविधा दिल्या नाहीत, मात्र ''आप''(AAP)ने अवघ्या पाच वर्षात दिल्लीत जादू केली आहे. गोव्याचे लोक चांगले आणि मेहनती आहेत. ''आप'' हा एकमेव पक्ष आहे जो राज्याला प्रामाणिक प्रशासन देऊ शकतो, असेही ते म्हणाले.

एक मंत्री जे सेक्स स्कँडलमध्ये अडकले होते, आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला होता; आता पक्षाने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. दुसरा ऑक्सिजन घोटाळ्यात सामील तर दुसऱ्या एका मंत्र्यावर त्याच्या खात्यातील नोकऱ्या विकल्याचा आरोप असल्याचा संदर्भ देऊन त्यालाही पुन्हा संधी दिल्याची टीका जैन(Jain) यांनी केली.

Satyendra Kumar Jain
साळावली धरणग्रस्‍तांच्‍या समस्‍यांना प्राधान्‍य देणार: सावित्री कवळेकर

कोरोना (Corona) साथीच्या पहिल्या टप्प्यात गोव्याची आर्थिक स्थिती ढासळत असताना, गोव्याचे (goa) भाजप सरकार घोटाळे करत होते. भाजप सरकार (BJP goverment) 500 कोटींच्या मजूर घोटाळ्यात गुंतले होते. जे पैसे गरीब मजुरांना हवे होते, ते भाजप कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले, तत्कालिन लोकायुक्तांना धाडसी निवेदन देऊन सरकारला कारवाईचे आदेश देण्यास भाग पाडले, तरीही कोणतीही कारवाई झाली नाही,असेही ते म्हणाले.

प्रियोळ, फोंडा, वाळपई येथील आप स्वयंसेवक आणि नेत्यांसमवेत घरोघरी प्रचारादरम्यान, जैन यांना लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लोक भाजप आणि काँग्रेसला कंटाळले असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला मतदान करणे म्हणजे भाजपला पाठिंबा देणे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यांनी या निवडणुकीत ‘आप’ला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे, असेही जैन म्हणाले. भाजप, काँग्रेसला (congress) जनता कंटाळलीय

गोमंतकीय जनतेने भाजप आणि काँग्रेसच राजवट अनुभवली आहे. या दोन्‍ही पक्षांच्‍या काळात भ्रष्‍टाचार, महागाई शिगेला पोचली. आता भाजप सरकारमधील मंत्रीच गैरकृत्‍यांत गुंतल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तसेच या सरकारमधील मंत्र्यांनी नोकऱ्यांचा अक्षरश: बाजार मांडून सुशिक्षित आणि पात्र युवकांवर मोठा अन्‍याय केला आहे. त्‍यामुळे गोव्‍यात आम आदमी पक्षच सत्तेवर येईल, असा विश्‍‍वास जैन यांनी व्‍यक्त केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com