jP Nadda criticizes opposition said How was Modi vaccination
Dainik Gomantak
भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर टीका केली. "गोव्यात येणाऱ्या नेत्यांनी बॅनरबाजी करून जनतेला भरकटविण्याचं काम केल. ज्यांनी लसीकरणाच्या फायद्यांबद्दल इतरांची दिशाभूल करण्याच्या प्रयत्नात कोविड -19 लसीच्या (Vaccination) डोसला "मोदी टिका" किंवा "भाजप का टीका" म्हटले. आता मी त्या लोकांना विचारतो, कसा होता मोदी टिका?" असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाना साधला. गोव्यात 100 लसिकरण झाले याबद्दल गोवा सरकारचे (Goa Government) आणि मुख्यमंत्री सावंत यांचे कौतूक केले, भाजप सरकारच्या सगळ्या योजना लोकहिताच्या आहेत हे पुन्हा सिद्ध झाले म्हणत. दयानंद स्वास्थ सेवा योजने अंतर्गत गोवेकरांना सरकारने केलेल्या मदतीची प्रशंसा त्यांनी यावेळी केली. ते गोव्यात एका जाहीर सभेला संबोधित करताना ते बोलत होते.
"गोव्याला अंमली पदार्थाचा अड्डा समजलं जाते, बरेच पर्यटक गोव्यात येवून अंमली पदार्थाचे सेवन करतात मात्र मी सांगू इच्छीतो की, गोव्यातील गुन्ह्यांचे प्रमाण 101 टक्क्यांनी कमी झाले असून, गुन्हे अन्वेशन विभागाला 93 टक्के यश आले आहे," अशी माहिती नड्डा यांनी दिली. भाजप अध्यक्ष दोन दिवसीय किनारपट्टी राज्याच्या दौऱ्यावर असून त्यादरम्यान ते दोन जाहीर सभा घेणार आहेत. आज बुधवारी नड्डा उत्तर गोव्यातील म्हापसा येथिल पक्षाच्या कार्यालयात बैठक घेणार आहेत.
गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. सध्या भाजपकडे 40 सदस्यांच्या विधानसभेत 17 आमदार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP), गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) चे विजय सरदेसाई आणि तीन अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे. गोव्यात पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.