भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा काल गोवा दौऱ्यावर होते. गोव्यात भाजपचा धडाक्यात प्रचार सुरू आहे. दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना. 'उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत भारतातील सर्व पक्ष घराणेशाही पक्ष बनले आहेत आणि कॉंग्रेस भारतीय कुटुंब पक्ष बनला आहे,' असे म्हणत नड्डा (JP Nadda) यांनी कॉंग्रेसला सुनावले आहे.
गोवा राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी (Goa Assembly Election 2022) 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी नड्डा गोव्यात पक्षाच्या समर्थनार्थ प्रचार करत होते. 'इतर पक्षांपेक्षा भारतीय जनता पार्टी (BJP) वेगळी आहे. भाजप प्रथम देशाचा विचार करते आणि भाजपकडे एक भक्कम वैचारिक आधार आहे. उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सर्व पक्ष 'कुटुंब पक्ष' बनले आहेत, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (Congress) 'भारतीय कुटुंब पक्ष' बनला आहे. सर्वांना सोबत घेऊन चालणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे, दक्षिण गोव्यातील फातोर्डा येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना नड्डा बोलत होते. भाजपशिवाय इतर सर्व पक्षांमध्ये नेतृत्व, कार्यकर्ते आणि काम करण्याची इच्छाशक्ती कमी असल्याचेही ते म्हणाले.
"भाजप हा एक विचारधारा आणि उद्देश घेवून चालणारा आणि धोरणांचे पालन करणारा पक्ष आहे. भाजप हा जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे, जो आपल्या कार्यकर्त्यांमुळे वाढत आहे. भाजप देशाला केंद्रस्थानी ठेवून आपली तत्त्वे आणि धोरणे पाळते. गोव्यातील सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्या नेतृत्वाखाली जोरात काम करत आहे, असेही या सभेत नड्डा बोलत होते.
पुढे बोलताना नड्डा यांना गोव्याचे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आठवण झाली. 'मला आठवते भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी भाजप कार्यकर्त्यांना उत्साहाचा नारा दिला होता. पर्रीकरांच्या अनुपस्थितीतही प्रमोद सावंत यांनी तो उत्साह कायम ठेवला आहे. भाजप सरकारच्या काळात गोव्यात आमूलाग्र बदल झाले आहेत. गोव्यातील लोक त्यांच्याकामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी बोटीतून नद्या कसे पार करायचे हे आम्ही पाहिले मात्र आता गोव्यात पुलांचे जाळे तयार झाले आहे लोकां त्रास कमी झाला आहे,' असे म्हणत नड्डा यांनी गोव्यातील प्रकल्पाची आठवण जनतेला करून दिली.
दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) गोव्यातील म्हापसा येथे एका सभेला संबोधित करणार आहेत. गोव्यातील निवडणूक प्रचार संपण्याच्या एक दिवस आधी, पंतप्रधान बोगेश्वर मैदानावर एका विशाल जाहीर सभेला संबोधित करतील. असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. कार्यक्रमस्थळी सुंदर रोषणाई आणि मोठा मंडप लोकांचे मुख्य आकर्षण आहे. संपूर्ण म्हापसामध्ये पंतप्रधानांच्या स्वागताचे फलक लावण्यात आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.