Goa Election: शिरोडा मतदारसंघात भाजपची खरी टक्कर ‘आप’शी

दुहींमुळे कॉंग्रेस पिछाडीवर, राष्ट्रवादीचे डॉ. प्रभुदेसाई सक्रीय, मगोपचाही जोरात प्रचार
Subhash Shirodkar
Subhash ShirodkarDainik Gomantak
Published on
Updated on

मिलिंद म्हाडगुत

शिरोडा हा फोंडा तालुक्यातील मतदारसंघ सुभाष शिरोडकरांचा गड म्हणून ओळखला जातो. तब्बल सातवेळा ते या मतदारसंघातून निवडून आले आहेत. 1984 साली शिरोडकर पहिल्यांदा निवडून आले होते. तत्पूर्वी 1980 साली कॉंग्रेसचे बाबय प्रभू यांनी विजय मिळवून तोपर्यंत शिरोड्यावर असलेले मगोपचे वर्चस्व संपुष्टात आणले होते. पण 1984 साली बाबय फोंड्यात गेले आणि शिरोड्यात सुभाष युग सुरू झाले. त्यानंतर 89, 94, 99, 2002 असा सलग चार वेळा सुभाषांनी विजय मिळवला. खरेतर 89 व 94 साली सुभाष भाऊ ‘डेंजरझोन’ मध्ये होते. पण थोड्या मतांनी का होईना त्यांनी विजयश्री खेचून आणलीच. (BJP AAP Goa Election 2022)

Subhash Shirodkar
गोव्यात 1 जुलैपूर्वी सिंगल यूज प्लॅस्टिकवर येणार बंदी

मात्र 2007 साली त्यांचे सहकारी महादेव नाईक यांनी भाजपच्या उमेदवारीवर सुभाष शिरोडकर यांचा पराभव केला. 2012 साली याचीच पुनरावृत्ती झाली. मात्र, 2017 साली सुभाष यांनी तब्बल 5000 मतांनी विजय मिळवून या दोन पराभवांचा वचपा काढला.

रिव्होल्युशनरी गोवन्सतर्फे शैलेश नाईक व अपक्ष म्हणून स्नेहल ग्रासीयस हे रिंगणात आहेत. आता हे कोणाच्या मताची काटछाट करतात हे पाहावे लागेल. शिरोडा मतदारसंघातील चारही पंचायतीत प्रचाराचा ‘धुमधडाका’ सुरू आहे. पण, सध्या ‘फोकस’ आहे तो आप व भाजपच्या (BJP) लढतीवर. शिरोड्यात सुभाष विरोधी असलेले वातावरणाचा आप फायदा घेतो की हा फायदा मगोपकडे वळतो हे बघावे लागेल. पण सुभाष हे ‘मुरब्बी खेळाडू’ असल्यामुळे ते ही परिस्थितीशी यशस्वी सामना करू शकतात, असे मतही व्यक्त होत आहे. आता हे मत प्रत्यक्षात उतरून सुभाष भाऊ आठव्यांदा विधानसभेत प्रवेश करतात की महादेव नाईक वा मगो त्यांना ‘चेकमेट’ देणार हे कळलेच.

2019 मध्ये बदलली समीकरणे

सुभाष शिरोडकर यांनी 2019 साली कॉंग्रेस (Congress) सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे परत समीकरणे बदलली. महादेव नाईक यांनी भाजपचा त्याग करून कॉंग्रेस प्रवेश केला आणि कॉंग्रेसच्या उमेदवारीवर 2019 सालाची पोटनिवडणूक लढविली. पण, त्यांना तिसरा क्रमांक प्राप्त झाला. अटीतटीच्या लढतीत सुभाष यांनी मगोपच्या (MGP) दीपक ढवळीकर यांच्यावर केवळ सत्तर मतांनी विजय मिळवला. आता परत सुभाष व महादेव आमने सामने आहेत. हे दोघेही अनुभवी असल्यामुळे एकामेंकावर ‘कुरघोडी’ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

कॉंग्रेससमोर अडचणी

शिरोड्याची कॉंग्रेसची उमेदवारी बोरीचे पंच तुकाराम बोरकर यांना दिल्यामुळे कॉंग्रेस कार्यकर्ते नाराज झालेले आहेत. वास्तविक ही उमेदवारी बोरीच्या सरपंच ज्योती नाईक यांचे पती मुकेश नाईक यांना मिळणार होती. पण सहा दिवसांपूर्वी कॉंग्रेसमध्ये आलेल्या बोरकर यांना उमेदवारी देऊन मुकेश व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्वप्नांवर कॉग्रेसने पाणी टाकले. खरेतर मुकेश व त्यांचे कार्यकर्ते गेली सहा महिने कार्यरत होते. पण आता उमेदवारी न मिळाल्यामुळे मुकेश यांनी कॉंग्रेस त्यागून संभाजी ब्रिगेड या पक्षातर्फे उमेदवारी दाखल केली आहे. यामुळे कॉंग्रेससमोर अडचणी निर्माण झाल्याचे दिसते.

Subhash Shirodkar
Assembly Election 2022: पाचही राज्याच्या एक्झिट पोलवर बंदी

अभय प्रभू यांच्याकडे ‘मगोप’चे दुर्लक्ष

मगोपतर्फे संकेत मुळे हे रिंगणात असून, ते शिरोड्याकरिता तरी नवखे उमेदवार म्हणून गणले जाताहेत. शिरोड्यात मगोपची स्वतःची अशी मते आहेत. त्यामुळेच पोटनिवडणुकीत दीपक ढवळीकर व 2017 साली झालेल्या निवडणुकीत अभय प्रभू यांनी लक्षणीय मते प्राप्त केली होती. पण, 2017 साली 5900 मते प्राप्त केलेल्या अभय प्रभू यांना मगोपने उमेदवारी का दिली गेली नाही हा प्रश्न उपस्थित होतो. अभय प्रभू यांची बेतोडा - निरंकाल पंचायतीत बरीच राजकीय शक्ती आहे. त्याचा फायदा मगोपला होऊ शकला असता. आता ही शक्ती कोणाकडे वळते हे बघावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com