गोव्यात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक

पेडणे, फोंडा, मुरगाव, वास्को आणि दाबोळी या 5 मतदार संघातच पुरुष मतदार अधिक आहेत.
Female voters
Female voters Dainik Gomantak

पणजी: गोव्यातील 40 पैकी 35 मतदारसंघात पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची संख्या अधिक आहे. पेडणे, फोंडा, मुरगाव, वास्को आणि दाबोळी या 5 मतदार संघातच पुरुष मतदार अधिक आहेत. या निवडणुकीत एकूण 11,47,545 मतदार मतदान करणार आहेत. यापैकी 5,59,758 पुरुष मतदार आहेत तर 5,87,787 महिला मतदार आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत देखील महिला (Women) मतदारांची संख्या अधिक होती.

Female voters
गोव्यात 'या' दिवशी रात्रभर संगीत वाजवण्याची परवानगी

उत्तर गोव्यापेक्षा दक्षिण गोव्यात महिला मतदार अधिक आहेत. उत्तर गोव्यात (Goa) 2,60,698 पुरुष मतदार आहेत तर 2,73,680 महिला मतदार आहेत. महिला आणि पुरुष मंतदारांमद्धे 12,982 एवढा फरक आहे. दक्षिण गोव्यात 3,14,107 महिला मतदार तर 2,99,060 पुरुष मतदार आहेत. हा फरक 15,047 एवढा आहे.

गोव्यात होणार कलम 144 लागू

आगामी गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election) पार्श्वभूमीवर राज्यात शनिवारी सायंकाळी 6 पासून 14 फेब्रुवारीच्या सायंकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.

Female voters
गोव्यात आज संध्याकाळपासून पुढील 2 दिवस कलम 144 लागू

दरम्यान, पाच किंवा जास्त व्यक्ती जमा होण्यास, मिरवणूक, रॅली आयोजित करण्यास किंवा बैठका आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पैशांचे आणि दारू वाटण्याचे प्रकार टाळण्यासाठी मतदानाच्या दिवशी निर्वाचन घेतलेली वाहने वगळून उमेदवारांना प्रचारासाठी परवानगी दिलेली सर्व वाहने बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. याकाळात खासगी वाहनांचीही तपासणी होईल. निवडणुकीच्या (Election) कालावधीत बेकायदेशीर कृत्ये करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com