मायकल लोबो, ढवळीकर, झांट्येंकडून गंभीर घोटाळे?

ADR अहवालातून धक्कादायक माहिती उघड
goa election candidates report from ADR is shocking
goa election candidates report from ADR is shockingDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: ADR ने समोर आणलेल्या माहितीनुसार, MGP चे दिपक ढवळीकर, प्रवीण झांट्ये आणि काँग्रेसचे उमेदवार मायकल लोबो यांच्यासह काही उमेदवारांच्या शपथपत्रात तफावत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. दीपक ढवळीकर यांनी मागील 4 निवडणुका लढवल्याप्रमाणे संपत्तीची किंमत दाखवली आहे. रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये नेहमीच वाढ होत असते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवारांना स्थावर मालमत्तेचे बाजार मूल्य दाखवावे लागते, असे ADR ने दिलेल्या माहितीत समोर आले आहे. (goa election candidates report from ADR is shocking)

goa election candidates report from ADR is shocking
टेकूचा आधार घेऊन सत्ता स्थापन करणाऱ्यांनी भाजपशी बरोबरी करू नये: CM प्रमोद सावंत

ढवळीकर यांच्या स्थावरमालमत्तेत मोठी तफावत

ढवळीकर (Deepak Dhavalikar) यांनी दाखल केलेल्या सध्याच्या प्रतिज्ञापत्रातून, पूर्वीच्या प्रतिज्ञापत्रात दाखवलेली मोठी जमीन गहाळ असल्याचे एडीआरने (ADR) निदर्शनास आणून दिले. ही मालमत्ता विकल्याप्रमाणे प्राप्तिकर परताव्यात देखील दिसून येत नाही, अशी माहीती एडीआरने दिली.

प्रवीण झांट्ये

तसेच, एडीआर च्या अहवालानुसार प्रवीण झांट्ये (Pravin Zantye) यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्या स्थावर मालमत्तेचा उल्लेख शून्य आहे. तसेच त्यांनी फॉर्मसोबत इन्कम टॅक्स रिटर्नही जोडलेले नाहीत.

मायकेल लोबो

मायकेल लोबो (Michael Lobo) यांनी, सादर केलेले वार्षिक उत्पन्न त्यांच्याकडे असलेल्या उच्च मालमत्तेशी जुळत नाही, असे एडीआरने दिलेल्या अहवालातून समोर आले.

41 ते 50 वयोगटातील उमेदवारांची संख्या जास्त, तर 70 वर्षांवरील 2

2022 च्या निवडणुकीसाठी (Goa Assembly Election) सर्वाधिक म्हणजे 112 उमेदवार 41 ते 50 वयोगटातील आहेत. तर 301 उमेदवारांची वयोनिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - 25-30 वयोगट 14 उमेदवार, 31-40 वयोगट 51 उमेदवार, 41-50 वयोगट 112 उमेदवार, 51-60 वयोगट 89 उमेदवार, 61-70 वयोगट 33 उमेदवार आणि 71-80 वयोगटात 2 उमेदवार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com