मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द
गोवा: मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचा राजीनामा राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लाई यांच्याकडे सुपूर्द केला आहे. लवकरच सरकार स्थापनेचा करणार दावा असल्याची माहिती त्यांनी दिली. नवीन सरकार येईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून पद संभाळण्याचे मुख्यमंत्र्यांना राज्यपालांनी आवाहन केले. (Goa CM Pramod Swant handovers resignation to governor)
सातवी विधानसभा सोमवारी14 मार्च रोजी विसर्जित होणार
सातवी विधानसभा सोमवारी (Goa Assembly Election) 14 मार्च रोजी विसर्जित करण्यात येईल आणि तसे पत्र राज्यपाल पी. एस.श्रीधरन पिल्लई यांना सोमवारी, ता. 14 रोजीच सादर करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली.
बुधवारी शपथविधीची शक्यता
सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 16 मार्चला संपत आहे. तत्पूर्वी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे. निवडणुकीत (Goa Election 2022) भाजपाला काठावरचे बहुमत मिळाले असून अपक्ष आणि मगो (MGP) पक्षाच्या आमदारांच्या सहकार्याने भाजप सरकार बनवणार हे स्पष्ट झाले आहे. यासाठी विधिमंडळ नेता निवडीची आवश्यकता असून ही निवड सोमवारी होण्याची शक्यता आहे. तसेच मंगळवारी 15 मार्च रोजी नव्या नेत्याचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.
भाऊसाहेब बांदोडकर यांना मुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
पहिले राज्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब तथा दयानंद बांदोडकर यांच्या जयंती निमित्ताने आज सकाळी त्यांच्या मिरामार येथील समाधी स्थळावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पुष्पांजली वाहत अभिवादन केले. यावेळी नव्याने निवडून आलेले अपक्ष आमदार चंद्रकांत शेट्ये , भाऊसाहेब यांची कन्या उपस्थित होत्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पर्वरीच्या सचिवालय परिसरातील बांदोडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. यावेळी सभापती राजेश पाटणेकर, मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल तसेच पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला उपस्थित होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.