निवडणूक येताच राज्यात वाहू लागले मोफत देवदर्शन यात्रेचे वारे

आता राज्य सरकारतर्फे मोफत मोफत तीर्थयात्रेचे आयोजन, म्हापसा येथे मुख्यमंत्र्यांची घोषणा ज्येष्ठ नागरिकांना पर्वणी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्यात (Goa) सत्तेवर आल्यास गोमंतकीयांसाठी मोफत तीर्थयात्रेचे आयोजन करण्याची हमी आम आदमी पक्षाचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी दिली आहे. याला आठवडा उलटण्यापूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.
निवडणुकीच्या तोंडावर गोव्यात भाजपमधील वाद अधिक तीव्र

डॉ. सावंत हे आज खोर्ली - म्हापसा येथे घाट्येश्‍वर मंदिरातील सभागृहाच्या उद्‍घाटनासाठी आले होते. तेथे त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेवक विराज फडके, देवस्थान समितीचे अध्यक्ष देश किनळेकर उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीपूर्वी म्हापसा शहराचा स्मार्ट सिटी योजनेत समावेश केला जाईल. शहराच्या विकासासाठी लवकरच निविदा काढण्यात येतील. घाट्येश्‍वर मंदिर परिसर पर्यटन महामंडळातर्फे विकसित केला जाईल, अशी ग्वाही सावंत यांनी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांनी आज म्हापशातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांसाठी प्राचीन मंदिरांना भेट देण्याच्या मोफत देवदर्शन यात्रेची (Free Devdarshan Yatra) घोषणा केली.
गोव्यातील तीन बायका, फडणवीसांची फजिती ऐका...

1 ते 19 डिसेंबरपर्यंत चालणार योजना

निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपने विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या विविध घोषणांची गंभीरपणे दखल घेतल्याचे दिसून येते. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी राज्यातील प्राचीन मंदिरांना भेटी दिलेल्या नाहीत. त्यामुळे 1 ते 19 डिसेंबर या कालावधीत मोफत देवदर्शन यात्रा सुरू करण्यात येणार आहे. ही योजना समाजकल्याण खात्याची आहे. इच्छुकांना नावनोंदणी करताना या खात्याकडे मतदार किंवा आधार ओळखपत्र सादर करावे लागेल.

मोफत तीर्थाटन पुण्य की पाप?

‘फुकट खाणं पोट फुगरे’ अशी कोकणीत म्हण आहे. हिंदू, ख्रिस्ती व मुस्लिम धर्मात तीर्थयात्रेला मोठे महत्त्व आहे. जीवनात एकदा तरी तीर्थयात्रा करावीच, अन्यथा पुण्य लाभत नाही असे मानले जाते. म्हणूनच मुस्लिम हाज करतात, हिंदू काशी, गया तिर्थयात्रा करतात. तर ख्रिस्ती लोक वालांकिनी, नाशिक किंवा जेरुजेलीम यात्रा करतात. मात्र तिर्थयात्रा स्वतः कमावलेले धन खर्च करून करावी, असा दंडक आहे. आता आम आदमी पक्षाने सत्तेवर आल्यास तिर्थाटन मोफत करण्याचा वादा केला आहे. आता गोमंतकीय भाविक या मोफत तीर्थ यात्रेच्या आशेने झाडूला साथ देतात की, आपला स्वाभिमान दाखवतात हे निवडणुकीनंतर कळेलच. एक मात्र खरे, राजकीय पक्ष आजही साम - दाम - दंड - भेद ही चाणाक्य नीती विसरले नाहीत. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com