पत्नीला उभी करायला मतदारसंघ ‘भाट’ आहे का?

राणे राजकीय निवृत्तीवर ठाम; सुनेला वाळपईत उमेदवारी देण्याच्या प्रश्नावर सवाल
Former Goa Chief Minister Pratap Singh Rane insists on political retirement

Former Goa Chief Minister Pratap Singh Rane insists on political retirement

Dainik Gomantak

Published on
Updated on

पणजी: माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे (Pratap Singh Rane) आणि त्यांचे चिरंजीव विश्वजीत राणे यांच्यात पर्ये मतदारसंघावरून सुरू झालेले वाकयुद्ध थांबण्याची चिन्हे नाहीत. आज जरी त्यांनी निवृत्तीच्या निर्णयावर ठाम असल्याची घोषणा केली असली तरी पुत्र विश्वजीत यांची वाळपई मतदारसंघात पत्नी दिव्या यांना उभे करण्याच्या प्रस्तावाला तीव्र नापसंती दर्शवली आहे.

‘वाळपईमधून डॉ. दिव्या राणे यांना विश्वजीत राणे (Vishwajit Pratapsingh Rane) यांनी उमेदवारी देण्याचे ठरवले ते काय आमचे भाट आहे काय?’ असा बोचरा सवाल ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी केला आहे.

वाळपईमध्ये विश्वजीत आपल्या पत्नीला उमेदवारी देऊ इच्छित आहेत?

त्यात मी पडू इच्छित नाही. कोणालाही देऊ देत. मात्र, ते आमचे काही भाट नाही. मी याला तिकीट देणार, त्याला तिकीट देणार हे ठरवायला आम्ही तेथील भाटकार नाही. माझी स्वतःची भाट आहेत, ती मी काढून कुणालाही देऊ शकतो.

<div class="paragraphs"><p>Former Goa Chief Minister Pratap Singh Rane insists on political retirement</p></div>
मुख्यमंत्री प्रमोद सावतांना निवडून आणण्याची जबाबदारी मावळच्या बाळा भेगडेंवर

दै. ‘गोमन्तक’च्या संपादकांनी काल सकाळी दूरध्वनीवरून प्रतापसिंह राणे यांच्याशी संवाद साधला, तो आम्ही शब्दशः देत आहोत ः

  • आज सकाळी आम्हाला समजले की, तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे?

सरकारने आता 65 वर्षे वय निवृत्तीसाठी जाहीर केले आहे. माझे तर ऐंशीच्या वर वय झाले आहे. जीवन व आरोग्य यासंदर्भात आता मी खेळ मांडू इच्छित नाही.

  • तरी वाळपईतील लोकांना तुम्ही हवे आहात?

मी त्यांच्यासाठी खूप कार्य केले आहे. आता त्यांचीही मुले चांगली शिक्षित बनली आहेत. एकाच माणसावर कुणी अवलंबून राहू नये.

  • तुम्हाला लोकांचे प्रेम मिळते आहे, तुमची कारकिर्दही नितळ मानली जाते.

आरोग्य चांगले राहिले तर यापुढे मी लोकांची कामे करीन. परंतु कुणी 100 वर्षे जीवंत राहात नाही.

पत्नीला उभी करायला मतदारसंघ ‘भाट’ आहे का?

<div class="paragraphs"><p>Former Goa Chief Minister Pratap Singh Rane insists on political retirement</p></div>
New Guidelines: गोव्यात ध्वनिक्षेपकावर रात्री 10 नंतर निर्बंध
  • तुम्ही मध्येच निवडणुकीत (Goa Election) उभे राहण्याचा विचार करीत होता?

मला एकदम निवृत्तीसंदर्भात बोलायचे नव्हते. मग सर्व विरोधक कामाला लागले असते. तेथे दहाजण उभे राहिले असते. आता मात्र मी निश्चितपणे ठरवले आहे, की राजकारणापासून दूर व्हायचे. ‘मी आता आराम करणार आहे आणि शांत जीवन जगू इच्छितो.’

  • मग पर्ये मतदारसंघात कोण उभे राहणार?

मला माहीत नाही.

  • विश्वजीत तेथून निवडणूक लढवू इच्छित आहेत?

राहू तर द्या ना त्यांना. (मिश्कीलपणे) पर्येत दोन विश्वजीत आहेत.

  • मी तुमचा पुत्र विश्वजीत यांच्याबद्दल विचारले?

तेथे कुणाला राहायचे ते राहू दे. मी निश्चितपणे निवडणूक रिंगणात नसेन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com