प्रदूषणाला आळा, गोव्यात पर्यावरण पुरक बनवला मतदान बुथ

बूथ सध्यातरी सारीकडे उभारणे शक्य नसले तरी प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी असा बूथ उभारण्याचा प्रस्ताव गोवा निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे.
Polling booth

Polling booth

Dainik Gomantak

Published on
Updated on

निवडणुकांसाठी जी तयारी केली जाते, त्यात वापर केलेल्या वस्तूंमुळे प्रदूषणयुक्त कचरा अपरिहार्यपणे तयार होतच असतो. अशाप्रकारच्या या कचऱ्याला आळा घालण्यासाठी गोव्याच्या निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कुणाल यांनी एका वेगळ्या कल्पनेचा अवलंब करायचे ठरवले आणि त्यातूनच आकार घेतला नैसर्गिक साधने वापरुन तयार झालेल्या मतदान बूथने (Polling booth).

Polling booth

...म्हणून वास्कोमध्ये भाजपचा विजय निश्चित झाला

‘गोवा स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड’च्या सहकार्याने अशा बूथचे मॉडेल बनवून मग ते गोव्यात निवडणुकीच्या (Goa Election News) तयारीची पाहणी करण्यासाठी आलेल्या भारतीय निवडणूक (Indian elections) आयोगासमोर सादरही केले गेले. या सादरीकरणाला भारतीय आयोगाकडून प्रशंसाही लाभली आणि त्यांनी या कल्पनेला उचलूनही धरले गेले. गोव्याच्या (Goa) हस्तकारागिरांनी तयार केलेल्या या हरित मतदान बूथमध्ये आतला पेपरवेट, बास्केट आदी सामान देखील बायोडिग्रेडेबल असेल.

येऊ घातलेल्या 2022सालच्या विधानसभा निवडणुकांसाठी हे बूथ जर वापरले गेले तर तो राज्यातला अशाप्रकारचा पहिला प्रयोग असेल. देशात अन्यत्र काही ठिकाणी असे प्रयोग झालेले आहेत. हे बूथ सध्यातरी (कमी असलेल्या वेळांमुळे) सारीकडे उभारणे शक्य नसले तरी प्रत्येक तालुक्यात किमान एक तरी असा बूथ उभारण्याचा प्रस्ताव गोवा निवडणूक आयोगाच्या विचाराधीन आहे.

Polling booth

Goa Election:'काँग्रेसचे स्थिर सरकार स्थापन करण्यात मडगावकरांची भूमिका निर्णायक'

या बूथेची एकंदर मांडणीसुद्धा आकर्षक अशीच आहे. बांबूंच्या चटयांचे विभाजन असलेल्या या बूथला भक्कम बांबूंचा पूर्ण आधार आहे. शिवाय भातांच्या कणसांचे पारंपारिक गोमंतकीय तोरणांनी तो सजलेला आहे. असा हा आगळ्यावेगळ्या रूपाचा बूथ मतदारांच्या डोळ्यांनाही नक्कीच सुखावेल.

प्रदूषणयुक्त कचऱ्याला फाटा देण्याच्या उद्देशाबरोबरच आणखीनही काही विधायक उद्देश अशाप्रकारच्या बूथमुळे सफल होऊ शकतील. जसे, गोव्याच्या ग्रामीण हस्तकारागिरांना त्यातून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकेल. त्याशिवाय निवडणूक आयोगाला वेगळ्या खात्यांना निवडणूकप्रक्रियेत सहभागी करून घेता येईल, ज्याप्रकारे, ‘गोवा बायोडायव्हर्सिटी बोर्ड’ या निवडणुकीसाठी त्यांना मदत करतो आहे. (निवडणूक आयोगाचे हेदेखील एक उद्दिष्ट आहे.)

Polling booth

दिलायला लोबो यांना शिवोलीमध्ये अपक्ष म्हणून लढण्यास भाजप पक्षश्रेष्ठींची मान्यता

निवडणूक हा जरी एक गंभीर मामला असला तरी तो लोकशाहीचा एक उत्सवच आहे. या उत्सवाला हरित बूथच्या रूपाने एक देखणा विचार आणि साज मिळत असेल तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com