Goa Assembly Election 2022: काँग्रेसने नुवेत फडकवला होता झेंडा; मात्र...

विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो डिसा (Wilfred Nazareth Menino Disa) हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत नुवे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते.
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2022: विल्फ्रेड नाझरेथ मेनिनो डी’सा हे 2017 च्या विधानसभा निवडणुकीत नुवे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. जुलै 2019 मध्ये विल्फ्रेड डि'सा यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात (Bjp) प्रवेश केला होता. यावेळी दक्षिण गोवा (South Goa) जिल्ह्यातील नुवे (Nuvem) सीटसाठी चुरशीची लढाई पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. (Congress Had Won The Nuvem Assembly)

2012 आणि 2017 साठी निवडणूक

2017 च्या निवडणुकीत, विल्फ्रेड डिसा (Wilfred Disa) यांनी गोवा सु-राज पक्षाचे उमेदवार फ्रान्सिस्को पाशेको यांचा 5,660 मतांनी पराभव केला होता. या निवडणुकीत विल्फ्रेड यांना एकूण 9,967 मते मिळाली होती. तर फ्रान्सिस्को पाशेको यांना 4037 मते मिळाली. 2012 मध्ये फ्रान्सिस्को पाशेको यांनी गोवा विकास पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अलेक्सो सिक्वेरा यांचा 4,196 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत फ्रान्सिस्को पाशेको यांना 12,228 तर अलेक्सो यांना 8092 मते मिळाली होती.

Congress
Goa Assembly Election 2022: या उमेदवारांचे नशीब होणार मतपेटीत बंद

नुवे विधानसभा मतदारसंघातील मतदारांची संख्या

नुवे ही जागा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे फ्रान्सिस्को सार्दीन (Francisco Sardinha) खासदार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या विधानसभा मतदारसंघात एकूण 28,200 मतदार होते. त्याच वेळी, एकूण वैध मतांची संख्या 21,447 होती. सध्या नुवे विधानसभा मतदारसंघात एकूण 28,363 मतदार असून त्यात पुरुष मतदारांची संख्या 13,091 आणि महिला मतदारांची संख्या 15,272 आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com