कुठ्ठाळी मतदार संघातून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले यांना भाजपाची उमेदवारी मिळावी म्हणून पंचायत मंत्री माविन गुदिन्हो (Panchayat Minister Mauvin Godinho) यांनी जोर लावला होता पण भाजपाने (BJP) त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते कुठ्ठाळीचे (Cortalim) मंडळ अध्यक्ष नारायण नाईक (Narayan Naik) यांना उमेदवारी जाहीर करुन गुदिन्हो यांना चपराक दिली. (BJP Nominated Narayan Naik From Cortalim)
भाजपसाठी आपल्या मनात गिरीष पिल्लेचे (Girish Pillai) नाव असल्याचे मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी जाहीर केले होते. पिल्ले यांच्या विकासकामांचे गुदिन्हो यांनी कौतुक केले होते. गोवेकर व परप्रांतीय असा भेदभाव न करता पिल्ले यांना उमेदवारी मिळाली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. गुदिन्हो यांनी पिल्ले यांचे नाव जाहीर केल्यावर कुठ्ठाळी भाजप मंडळाने नाराजी व्यक्त करून कुठ्ठाळीच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यास व त्याला निवडून आणण्यास मंडळ सक्षम असल्याचे जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे पिल्ले यांचे नाव बरेच गाजत होते.
कुठ्ठाळी मतदारसंघातून सांकवाळचे सरपंच गिरीश पिल्ले यांना भाजपची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, ते अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे घोषित केले होते.मात्र माविन गुदिन्हो आपल्या मतावर ठाम होते. माजी आमदार एलिना साल्ढाणा यांची आपतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजप वगळता इतर राजकीय पक्षांचे उमेदवार ठरले होते. यंदा पिल्ले वगळता बहुतेक जुनेच चेहरे नजरेस पडणार आहे. फक्त त्यांनी पक्षाची अदलाबदल केल्याचे चित्र समोर येईल.
दरम्यान आज कुठ्ठाळी मतदारसंघातून भाजपची उमेदवारी नारायण नाईक यांना देऊन एकप्रकारे माविन गुदिन्हो (Panchayat Minister Mauvin Godinho) यांना एकप्रकारे चपराक मिळाला आहे.गिरीष पिल्ले यांच्या नावाची भाजपच्या उमेदवारीसाठी गुदिन्हो यांनी केलेली शिफारस अखेर फोल ठरली आहे.दरम्यान आज कुठ्ठाळी मतदारसंघातून नारायण नाईक यांना उमेदवारी जाहीर होताच भाजपा कार्यकर्त्यांनी जल्लोषी स्वागत केले.देवा चरणी श्रीफळ ठेवून नारायण नाईक यांनी आपल्या प्रचार कार्यास सुरुवात केली.मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे नाईक यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.