पणजी: मनोहर पर्रीकरांनी दिलेला वारसा जपत मी पणजीतून निवडणूक लढवतोय. जनतेच्या प्रश्नांसाठी हा लढा सातत्याने सुरुच राहिल. मनोहर पर्रीकर हयात असताना राजकारणात येण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. मात्र आता मनोहर पर्रीकरांच्या तत्वांना मूठमाती दिली जात असल्याने नाईलाज म्हणून मला राजकारणात यावं लागलं आहे, असे दैनिक गोमन्तकशी बोलताना उत्पल पर्रीकर म्हणाले. (Goa Election 2022)
आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत पणजी (Panaji) मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकीकडे भाजपचे उमेदवार बाबुश मोन्सेरात उभे आहेत तर त्यांच्या विरोधान भाजपशीच बंड करून अपक्ष निवडणूक लढवणारे उत्पल पर्रीकर आहेत.
गोमन्तकशी बोलताना उत्पल म्हणाले, मी माझ्या शब्दांचा पक्का आहे. मी पणजीचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक लढवत आहे. मी लोकांसाठी लढत आहे आणि मला खात्री आहे की पणजीची लोक मला साथ देतील. माझ आयुष्य सुरळीत सुरू होते. मात्र मी आता निवडणुकीत (Election) उतरण्याचा निर्णय घेतला आहे आणि आता इथून माघार घेणार नाही. ते पुढे म्हणाले, पणजीत अनेक समस्या आहेत. पार्किंग येथील एक मोठी समस्या आहे, त्यावर तोडगा काढला पाहिजे. मला लोकांसाठी काम करायचे आहे. मला लोकांना खोटी आश्वासणे देण्यात रस नाही.
कसिनोबद्दल तुमचे काय मत आहे, असे विचारले सता उत्पल म्हणाले, सरकारला आपल्या फायद्यासाठी कसिनो चालवायचे आहेत. कसिनो नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. यासाठी काही धोरण आखावे लागेल. पणजीत सुरू असलेल्या त्यांच्या प्रचाराबद्दल बोलताना उत्पल म्हणाले, लोक मला खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. भाजपचे अनेक कार्यकर्ते माझ्याशी चुडलेले आहेत.
निवडून आल्यावर तुमची काय रणनीती असणार या प्रश्नाचे उत्तर देताना उत्पल म्हणाले, मी माझ्या शब्दावर ठाम राहीन. मी कोणत्याही पक्षाशी जुडणार नाही. मी अपक्ष राहूनच काम करेन. यावेळेस त्यांनी गोव्यातील विद्यार्थ्यांवर देखील भाष्य केले. ते म्हणले, अनेक मुले शिक्षणासाठी व नोकरीसाठी बाहेर जातात. ही चिंतेची गोष्ट आहे. आपण या मुलांसाठी ईथेच कामाची व शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे.
भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी एक आमदार (MLA) कमी पडत असेल तर उत्पल त्यांची मदत करणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर देताना ते म्हणाले, भाजपला एका आमदारची गरज असेल तर तो मी नक्कीच नसेन. मी भाजपला पाठिंबा देणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.