Goa Elections Campaign: मुख्यमंत्र्यांची हरवळेतून निवडणूक प्रचाराला सुरूवात

आज मुख्यमंत्री यांनी देवी केळबाई आणि देवी सातेरी यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज हरवळे येथून निवडणूक प्रचाराला सुरूवात केली.
BJP begin Election Campaign from Harvalem today
BJP begin Election Campaign from Harvalem todayDainik Gomantak

Goa Elections Campaign: गोवा विधानसभा निवडणुकीचे बिगूल आता वाजले आहे. सर्वत्र निवडणुकीची जय्यत तयारी सुरू आहे. निवडणुकीचे परिपत्रक (Goa Assembly Elections 2022) जाहीर झाले आहे. सर्वच पक्षांतर्फे आता निवडणूक प्रचाराला गती मिळाली आहे.

आज मुख्यमंत्री (CM Pramod Sawant) यांनी देवी केळबाई आणि देवी सातेरी यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही आज हरवळे (Harvalem) येथून निवडणूक प्रचाराला (Election Campaign) सुरूवात केली. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गोवा विधानसभा निवडणूक आता जाहीर झाली आहे. त्यासाठी भाजप (BJP) पक्ष सर्वतोपरी सज्ज आहे. आज आम्ही देवी केळबाई आणि देवी सातेरी यांचे दर्शन घेतले आणि आम्हाला विश्वास आहे की जनता आम्हाला नक्कीच सहयोग करेल. गावातील विकासासाठी स्थानिकांचा आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी ठरला आहे. गावात विकास करण्यासाठी गावकरी आणि कार्यकर्ते मला संधी देतील अशी मला हमी आहे.'

BJP begin Election Campaign from Harvalem today
Goa Elections: मी ही निवडणूक लढवणार आणि जिंकणारही...: राजेश पाटणेकर

ते पुढे म्हणाले, 'हरवळे गावातून उत्साहाच्या वातावरणात आमच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. आणि पुढेही असेच उत्साहाचे वातावरण इथे राहील. चांगले यश आम्हाला आणि आमच्या भाजपच्या या मतदारसंघातून मिळणार आहे. परत एकदा भारतीय जनता पार्टीचे सरकार गोव्यात यावे, असे मला मनापासून वाटते. जेणेकरून आम्ही मतदारसंघाचा आणि एकंदरीत विकास साधू.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com