Goa Elections: मी ही निवडणूक लढवणार आणि जिंकणारही...: राजेश पाटणेकर

मी केलेल्या कामामुळे डिचोलीमधील जनता खूश आहे. त्यामुळे मी अधिक मतांनी ही निवडणूक जिंकणार आहे, असा आत्मविश्वास डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी व्यक्त केला आहे.
सभापती राजेश पाटणेकर
सभापती राजेश पाटणेकरDainik Gomantak

Goa Elections: गोवा विधानसभा निवडणूकीचे परिपत्रक आता जाहीर झाले असल्यामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. सर्वच पक्षांतर्फे कसोटीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अनेक राजकीय नेत्यानी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. यातच डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर (Speaker Rajesh Patnekar) यांनीही आपला अजेंडा स्पष्ट केला आहे.

सभापती राजेश पाटणेकर
Goa Election: प्रसाद गावकर देणार आज आमदारकीचा राजीनामा

ते म्हणाले की, 'मी ही विधानसभा निवडणूक (Goa Assembly Elections 2022) लढवणार आहे. मी केलेल्या कामामुळे डिचोलीमधील (Dicholim) जनता खूश आहे. त्यामुळे मी अधिक मतांनी ही निवडणूक जिंकणार आहे.' त्यांनी दाखवलेल्या या आत्मविश्वासमुळे त्यामागील पार्श्वभूमी नेमकी काय, अशी चर्चा सध्या सुरू आहे. शेवटी कोण जिंकणार ही संपूर्णपणे निवडणूक झाल्यावरच कळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com