गोव्याच्या निकाला आधी सोमय्यांनी सेनेला डिवचलं

अद्याप कोणत्याही जागेचे निकाल स्पष्ट झालेले नसताना सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.
Kirit Somaiya
Kirit SomaiyaDainik Gomantak

गोवा विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) मतमोजणीला सुरुवात झाली आहे, तर अश्यातच भाजपसाठी धक्कादायक असा कौल हाती येत आहे. सध्या मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) हे पिछाडीवरती आहेत. तर माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकरसुद्धा पिछाडीवरती आहेत. (Before Goa verdict Kirit Somaiya has targeted Shiv Sena)

Kirit Somaiya
AAP ठरणार मोठा पक्ष व्हीआयपी जागांवर कोण पुढे, कोण मागे?

भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चढाओढ सुरु झाली आहे. शिवसेनेला गोव्यात (Goa) अजून खातंही उघडता आलेलं नाही. यावरून भाजप नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी शिवेसेनेवर (Shivsena) टीका केली आहे. अद्याप कोणत्याही जागेचे निकाल स्पष्ट झालेले नसताना सोमय्यांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

सोमय्यांनी ट्विटरवरून टोला लगावताना म्हटलं आहे की, 'उद्धव ठाकरे साहेब, आदित्य ठाकरे जी आणि आदरणीय संजय राऊत जी गोव्यात शिवसेना कुठे आहे!!??' गोव्यात 40 पैकी 13 जागांचे कल हाती आले असून भाजप 7 तर काँग्रेस 3 जागांच्या आघाडीवरती आहे.

गोव्यात पुन्हा भाजप येणार?

गोव्यात सध्या मुख्यमंत्री असलेल्या प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली भाजप निवडणूक लढत आहे तर, 2017 च्या निवडणुकीत भाजपला 40 पैकी 13 जागाच जिंकता आल्या होत्या, तर काँग्रेसने सर्वाधिक 17 जागा जिंकल्या होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com