गोव्यातली कुजबूज

Priyanka Deshmukh

दिगंबरांचा भाजपवर निशाणा

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून राज्यपाल मदतनिधीतून कोविडच्या आपत्तीमुळे संकटात सापडलेल्यांना मदत दिली. एरव्ही भाजपच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाला असा खर्च करणे हे वायफळ आहे म्हणून काँग्रेसने टीका केली असती. मात्र नेमकी हीच संधी साधून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी राज्यातील भाजप सरकारवर बरोब्बर निशाणा साधला आहे.

गोव्यातली कुजबूज | Dainik Gomantak

मडगाव रवींद्र भवनात ‘आरजी’

‘आरजी’वाले हे गोवा फॉरवर्डचे कट्टर विरोधक व टिकाकार. त्यामुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या न्यायाने त्यांना रवींद्र भवन दिले गेले नाही ना? ही आमची नव्हे काही फातोर्डावासींयांचीच शंका, बरं का? ∙∙∙

गोव्यातली कुजबूज | Dainik Gomantak

मुख्यमंत्र्यांचे प्रतिस्पर्धी

मी मुख्यमंत्रीपदाचा स्पर्धक नाही. जिंकून आलो तर तुम्ही दिलेले कुठलेही खाते मी सांभाळायला तयार आहे, अशी स्पष्ट ग्वाही दिली. पक्षाची तिकीट मिळून जिंकून येण्यासाठी ज्येष्ठ नेतेही किती धडपडू लागले आहेत, याचेच हे उदाहरण आहे.

गोव्यातली कुजबूज | Dainik Gomantak

‘स्वाभिमानी पार्टी’

निवडणूक आयोग सध्या खूप ताठर झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. याचा प्रत्यय ‘गोंयचो आवाज’ या नव्यानेच स्थापन होऊ पाहणाऱ्या पक्षाला आला. ‘गोंयचो आवाज’ ही आता ‘गोंयचो स्वाभिमान पार्टी’ झाली आहे. लोकांच्या आठवणीत राहायला हे नाव सोपे आहे काय? याचे नाव हे निवडणूक आयोगाची कमाल. ∙∙∙

गोव्यातली कुजबूज | Dainik Gomantak

म्हणे फोटो काढू नका

पणजी डॉन बॉस्को येथील लसीकरण केंद्रावर उपस्थित एक सरकारी अधिकारी वर्तमानपत्रांच्या छायापत्रकारांना छायाचित्रे काढण्यास मज्जाव करत आहे. आज तेथे गेलेल्या छायापत्रकारांना त्यांनी परतवून लावले. अशा अधिकाऱ्यांमुळेच लोकांत जागृती होत नाही आणि लसीकरण कमी होते. लसीकरण मोठ्या प्रमाणात होण्यासाठी प्रसिद्धी गरजेची आहे. हे या अधिकाऱ्याला वरिष्ठ कधी सांगणार देवाला माहीत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

गोव्यातली कुजबूज | Dainik Gomantak