Election Campaign: 'आप'च्या प्रचाराला प्रारंभ; शहापूरकर यांचा जनतेशी संवाद

आम आदमी पार्टी जातिनिशी लक्ष घालून त्या महिलांना न्याय मिळवून देणार असल्याचे शहापूरकर यांनी सांगितले.
 Election Campaign

Election Campaign

Dainik Gomantak
Published on
Updated on

Election Campaign: गोवा विधानसभेच्या निवडणुका वेळेत होणार असून घरोघरी प्रचाराला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र पालये पंचायत क्षेत्रांत पाणी समस्या तीव्र तसेच गृहआधार योजनेचे पैसे मिळाले नसल्याने नाराजी असून याबाबत अधिकाऱ्यांशी बैठक व चर्चा करण्याचे धोरण असून त्यासाठी लवकरच निवेदन देण्यात येईल, असे आपचे ॲड. प्रसाद शहापूरकर (Adv. Prasad Shahapurkar) यांनी मतदारांना सांगितले.

<div class="paragraphs"><p> Election Campaign </p></div>
बेतोडा-फोंड्यात 6 लाखांचे अंमली पदार्थ जप्त!

पालये पंचायत क्षेत्रातील किरणपाणी,मिर्झलवाडा,देऊळवाडा,नाईकवाडा,बावाखान वाडा आदी भागांत घरोघरी भेटी दिल्या व समस्या जाणून घेतल्या. पाणी टंचाई ही आम बात असली तरी जितका साठा उपलब्ध आहे,त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केल्यास टंचाई जाणवणार नाही,असा निष्कर्ष आपचे उमेदवार ॲड. प्रसाद शहापूरकर यांनी सांगितले. पालये गावातील पाणी पुरवठ्याबाबत माहिती असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार नियोजनच आवश्यक असल्याचे स्पष्ट होते. त्यादृष्टीने पाणी पुरवठा खात्याचे कर्मचारी, अधिकारी, ग्रामस्थ तसेच नळ जोडणीदार अश्यांची बैठक घेण्याची संधी आम आदमीतर्फे केली जाईल,असे सांगितले. 30 एम एलडी प्रकल्प किंवा नवीन जलकुंभ उभारणे ह्या फार दूरच्या गोष्टी असून जलनियोजन केल्यास उपलब्ध साठा नागरिकांना मिळेल असा आशावाद शहापूरकर यांनी व्यक्त केला.

<div class="paragraphs"><p> Election Campaign </p></div>
'रेजिनाल्ड यांनी पक्ष सोडला हे चांगलंच झालं'

ह्या भागांतील महिलांना गृहआधारचे मासिक पैसे कित्येकांच्या खात्यात जमा झाले नसून काहींना दीड वर्षे मिळालेच नसल्याचे नजरेस आणून दिले. याबाबत आम आदमी पार्टी (AAP) जातिनिशी लक्ष घालून त्या महिलांना न्याय मिळवून देणार असल्याचे शहापूरकर यांनी सांगितले. पक्षाची दोन्ही कार्यालये मांद्रे व केरीत सुरू आहेत. गृहआधारचे महिलांना मासिक 2500 रुपये व 18 वर्षावरील महिलांना मासिक 1 हजार रुपये देण्याचे आश्वासन नव्हे, तर सध्या वितरित केलेल्या फॉर्मच्या आधारे सरकार घडल्यानंतर त्यांच्या खात्यात जमा होईल, ह्याची हमी आहे. महिलांनी त्याचा लाभ घ्यावा असे सांगितले.

ह्या आधी आम आदमी पक्षाने मोफत वीज, बेरोजगार युवकांना मासिक 3 हजार रुपये, नोकरी गेलेल्या खाणबधितांना मासिक 5 हजार रुपये, अयोध्या, शिर्डी, वेलांकणी, अजमेर शरीफ तीर्थक्षेत्र भेटी, इस्पितळ व मोहल्ला क्लिनिक, मोफत उच्च शिक्षण व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन ह्या हमी पक्षाने जाहीर केल्या असल्याचे मांद्रे मतदारसंघाचे उमेदवार ॲड. शहापूरकर यांनी घरोघरी भेटीत माहिती दिली. त्यांच्याबरोबर प्रचारामध्ये (Campaign) पक्षाचे कार्यकर्ते सहभागी असतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com