Goa Navratri 2024: चालुक्य राजघराण्याच्या काळात बांधलेलं गोव्यातील सर्वात मोठं मंदिर

Shree Mahalasa Narayani Devalaya Verna: मूळ स्थानावर अगदी भव्यदिव्य स्वरूपात अस्तित्वात आलेलं मंदिर म्हणजे वेर्णा औद्योगिक वसाहतीत नव्याने वसवण्यात आलेलं श्री महालसा नारायणी देवालय.
Shree Mahalasa Narayani Devalaya Verna: मूळ स्थानावर अगदी भव्यदिव्य स्वरूपात अस्तित्वात आलेलं मंदिर म्हणजे वेर्णा औद्योगिक वसाहतीत नव्याने वसवण्यात आलेलं श्री महालसा नारायणी देवालय.
Mahalasa Narayani vernaDainik Gomantak
Published on
Updated on

Shree Mahalasa Narayani Devalaya Verna, Goa

पणजी : काही दिवसांपूर्वी गोव्यातील सर्व स्थलांतरित झालेल्या मंदिरांची मूळ स्थाने शोधून काढून तिथे त्या देवीच्या नवीन मंदिराचे पुन्हा निर्माण करण्याची एक कल्पना कुणीतरी मांडली होती व ही मोठी बातमी सुमारे एक पंधरवडा प्रसारमाध्यमांमध्ये चवीने चर्चिली जात होती.

या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे स्थलांतरित झालेल्या देवीच्या मूळ स्थानावर पुर्णत्वास आलेलं मंदिरच देऊ शकेल. मूळ स्थानावर अगदी भव्यदिव्य स्वरूपात अस्तित्वात आलेलं मंदिर म्हणजे वेर्णा औद्योगिक वसाहतीत नव्याने वसवण्यात आलेलं श्री महालसा नारायणी देवालय. या भागाला पोन्नें (पुरातन वा पुराणे) म्हार्दोळ वा म्हाड्डोळ असेही म्हणतात. वरेण्यपूर हेही या भागाचं प्राचीन काळी लाभलेलं नाव आहे.

इतिहास (Mahalasa Narayani Temple Verna History)

महालसा नारायणी देवी इथून म्हणजेच वेर्ण्यातून म्हार्दोळ गावी स्थलांतरित झाल्यानंतरही इथे एका छोट्याशा झोपडीत देवीच्या मूर्तीची नित्यपूजा गुप्तपणे चालायची. वेर्णा पठारावर एक तलाव आहे जिथून साळ नदी उगम पावते व त्या तलावाला नुपूर तीर्थ असे‌ म्हणतात.

Shree Mahalasa Narayani Devalaya facebook

महाजनांशी संवाद साधला असता मूळ मंदिर हे चालुक्य राजघराण्याच्या काळात बांधलं गेलं अशी माहिती मिळते. खोदकाम व पुरातत्व खात्यातर्फे संशोधन केल्यानंतर त्यातील देवालयाचे सापडलेले अवशेष हे तेराव्या वा चौदाव्या शतकातील असल्याचा पुरावा समोर येतो. अवशेष पाहिल्यावर पोर्तुगीज काळात एका सुंदर व सुबक पाषाणी मंदिरावर हल्ला झाला व ते पार जमीनदोस्त हे कळून येते.

जरी मंदिर काँक्रीटपासून घडवलेले असले तरीही मंदिराच्या आतील भिंतींना ग्रेनाईटच्या जाड फरशा बसविण्यात आल्या आहेत.

महत्त्व (Mahalasa Narayani Temple Verna Importance)

आजतागायत गोव्यात मूळ स्थानी जेवढ्या मंदिरांचे निर्माण झाले त्या सर्व मंदिरामध्ये हे मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून सर्वश्रेष्ठ आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. मंदिराच्या समोरील तलावाच्या पलिकडे असलेल्या तीन मजली सज्जातून दृष्टिक्षेप टाकला असता मंदिराची भव्यता कळून येते.

Shree Mahalasa Narayani Devalaya facebook

संपूर्ण मंदिराच्या आतील प्राकार हा जांभ्या दगडाच्या चौकोनी फरशांनी (चिरे) सुबक व सुशोभित केलेला आहे. साडेचारशे वर्षांनंतर एकविसाव्या शतकातील पहिल्या दशकात मूळ स्थानी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना व एक सुनियोजित पर्यटनस्थळ म्हणून या मंदिराकडे पाहता येईल.

Shree Mahalasa Narayani Devalaya Verna: मूळ स्थानावर अगदी भव्यदिव्य स्वरूपात अस्तित्वात आलेलं मंदिर म्हणजे वेर्णा औद्योगिक वसाहतीत नव्याने वसवण्यात आलेलं श्री महालसा नारायणी देवालय.
Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

वैशिष्ट्य (Mahalasa Narayani Temple Verna Significance)

गोव्यातील सर्वात मोठे मंदिर म्हणून श्री महालसा देवालय सुप्रसिद्ध आहे. जवळपास दहा एकर जमिनीवर पसरलेला हा मंदिर प्रकल्प वेर्णा पठाराची शोभा वाढवतो. एक धार्मिक संस्था म्हणून एक संस्थान कार्यरत आहेत पण त्याशिवाय देवस्थान पुर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक पातळीवर शिक्षणसंस्था चालवते. आजुबाजूच्या परिसरातील रहिवासी आपल्या मुलांना शिक्षणासाठी म्हणून आवर्जून या शाळेत पाठवतात. पठारावर तसा पाण्याचा स्त्रोत सापडणे कठीण असते पण देवीच्या कृपेने मंदिराच्या अगदी समोर पाण्याचा भलामोठा तलाव आहे.

Shree Mahalasa Narayani Devalaya facebook

दक्षिण भारतीय पद्धतीप्रमाणे मंदिराच्या एकूण प्राकाराची रचना चौकोनी आहे आहे व या संपूर्ण प्रकल्पात शाळा, संस्थानाचे प्रशासकीय कार्यालय, भक्तनिवास, कोणत्याही मोठ्या समारंभासाठी तीन भव्य सभागृहे, पुरोहितांसाठी निवास, मंदिर भाविकांना तसेच कर्मचाऱ्यांना स्वच्छतागृह अशी व्यवस्था आहे. देवळाभोवती अतिशय सुंदर पध्दतीने नियोजन केलेले उद्यान आहे ज्यात ओळीने शिस्तीत झाडे लावली आहेत.

नवरात्री विशेष (Navratri in Goa)

नवरात्रौत्सवात या देवालयात देवीला दररोज सुहासिनींतर्फे कुंकूमार्चन, अभिषेक, महापूजा, सांयकाळी पुराण, किर्तन व मखरोत्सव व मखरारती अशी सेवा श्रीचरणी अर्पण केली जाते. हे मंदिर काँक्रीटचे असल्याकारणाने येथे मखराचे कपट अथवा देव्हारा हा छोटेखानी बनवला गेला आहे. मखरारतीनंतर प्रसाद वितरण होते.

कसे पोहोचाल? (How to reach Verna?)

  • राष्ट्रीय महामार्ग क्र.६६च्या बाजूला वेर्णा औद्योगिक वसाहत वसलेली आहे व या औद्योगिक क्षेत्रात श्री महालसा नारायणी देवीचे देवालय वसलेले आहे.

  • दाबोळी विमानतळापासून हे देवस्थान १४ किमी म्हणजे पंचवीस मिनिटे अंतरावर आहे.

Shree Mahalasa Narayani Devalaya facebook
  • मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान ५४ किमी सव्वा तासाच्या अंतरावर आहे.

  • मडगाव रेल्वे जंक्शनपासून हे देवस्थान १५ किमी म्हणजे ३१ मिनिटांच्या अंतरावर आहे.

  • मडगाव ते पणजी किंवा पणजी ते मडगाव या राष्ट्रीयीकरण केलेल्या बसमार्गावरून दर पंधरा मिनिटांत एक याप्रमाणे बसेस उपलब्ध असतात.

खर्च (Cost)

दक्षिण गोव्यातील इतर पर्यटन स्थळांसोबत एका दिवसात ह्या ठिकाणी भेट देता येते त्यामुळे ₹१५००-२००० रूपयांत सर्व खर्च होतो.

हे करा (Do's)

  • मंदिरात अंगभर कपडे घालून जा

  • मंदिराच्या गेटवर चपला काढण्याची घालून दिलेली शिस्त पाळा.

Shree Mahalasa Narayani Devalaya facebook

हे करू नका (Dont's)

  • मंदिरातील देवांच्या पूजेसाठी राखून ठेवलेल्या बागेतील फुलांना हात लावू नये.

  • मंदिरात मद्यपान, मांसाहार, मत्स्याहार किंवा कोणत्याही प्रकारचे अपेय पान करून जाऊ नये.

  • मंदिरात सभामंडपाला गोलाकार घुमट असल्याकारणाने आवाज घुमतो, भाविकांनी अजिबात बोलू नये.

  • मंदिराच्या प्राकारात शाळा चालू असताना त्या बाजूला विनाकारण जाऊ नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com