Navratri In Goa: महाराष्ट्रातील तुळजापूरमधून गोव्यात आणलेली मूर्ती; वाचा गोव्यातील देवीच्या मंदिराचा इतिहास

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan: ही देवी महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मूर्ती व या देवीची मूर्ती एकसमान आहेत
Shree Bhagwati Haldonkarin Devasthan: ही देवी महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मूर्ती व या देवीची मूर्ती एकसमान आहेत
Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Marcel Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Facebook
Published on
Updated on

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan, Khandola Marcel 

प्रा. विघ्नेश शिरगुरकर वांते, सत्तरी गोवा

(vighneshshirgurkar@gmail.com)

अनेक अतिथी देवस्थानांना व त्यांच्या कुळावींना जमीन देऊन वास्तव्य करायला मदत करणारा अत्रुंज महाल वा फोंडा तालुका हा खरोखरच उदार अंतःकरण असलेला प्रदेश म्हटला पाहिजे. खांडोळा-माशेल पंचक्रोशीतील प्रसिद्ध देवस्थानांपैकी एक देवस्थान म्हणजे श्री भगवती हळदोणकरीण देवस्थान.

ही देवी महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मूर्ती व या देवीची मूर्ती एकसमान आहेत. या देवस्थानात मुख्य देवी व्यतिरिक्त इतर पंचायतन देवता आहेत. श्री सातेरी, श्री दाड, श्री रवळनाथ, श्री सिद्धनाथ, श्री लक्ष्मीनारायण जोशीपुरूष व श्री मल्लिनाथ पुरुष अशी ही देवस्थाने आहेत. या देवस्थानच्या नियमावली वा घटनेच्या आधारे या देवस्थानामध्ये महाजनांचे सात वांगड आहेत. पण हळदोण ग्रामसंस्थेचे मिळून बारा वांगड आहेत.

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Facebook

हळदोणे गावातील मूळ रहिवासी व बाटाबाटीच्यावेळी जबरदस्तीने धर्मांतरित झालेल्या ख्रिस्ती बांधवांची देखील या देवीवर श्रध्दा आहे व आपल्या आर्थिक व कौटुंबिक अडीअडचणीत हे ख्रिस्ती भाविक काही चौकशी-विचार करण्यासाठी देवीचा कौलप्रसाद घ्यायला देवस्थानात येतात.

जरी धर्म बदलला असला तरीही ख्रिस्ती बांधवांची श्रध्दा गेल्या पाचशे वर्षात तसुभरही कमी झालेली नाही याची अनुभूती येते. देवस्थानातील वार्षिक उत्सव, पालखी उत्सव, वसंत पूजा, श्रावणी सोमवार, नवरात्रौत्सव, दसरा, दिपोत्सव, कालौत्सव, श्री सातेरी देवीची जत्रा, श्री रवळनाथ प्रतिष्ठापना वर्धापन दिवस हे येथील महत्वाचे दिवस आहेत‌.

इतिहास (Shree Bhagwati Haldonkarin Devasthan History)

बाराव्या शतकात ही महिषासुरमर्दिनीच्या रूपातील भगवती देवी हळदोणे या गावात स्थापित केली होती असे म्हणतात. ही मूर्ती( महिषासुरमर्दिनी व शीला मूर्ती) महाराष्ट्रातील तुळजापूर येथून आणली होती. बाटाबाटीच्या वेळी या देवीच्या देवालयावर आक्रमण झाले व महाजनांना तिथून निघून जावे लागले. इसवी सन १५६७ साली हळदोणे गावातून मये येथील हळदोणवाड्यावर देवीचे पहिले स्थलांतर झाले.

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Facebook

देवीच्या स्थलांतरामुळेच या वाड्याला हळदोणवाडा नाव पडले असावे. मये या गावाच्या जवळच हळदोणे गाव असल्याकारणाने पोर्तुगीजांच्या भयाने महाजन व कुळांमध्ये देवीला दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचे पक्के झाले असावे.

देवीने हळदोणे गावातून मये येथे पहिले प्रयाण केले व इसवी सन १७४८साली खांडोळा वा खंडोळे येथे दुसरे प्रयाण केले. या देवस्थानाला १९२८ साली 'रेग्युलामेन्तो माझानिया' या पोर्तुगीजकालीन कायद्यानुसार नोंदणीकृत धार्मिक संस्था म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळाली व तशी नोंद, 'Buletin Oficial' या पोर्तुगीज राजपत्रात सापडतात.

वैशिष्ट्य (Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Significance)

महापर्वणी हा या देवस्थानातील सर्वात मोठा उत्सव आहे. या दिवशी श्रींची मूर्ती पालखीत बसते व वाजतगाजत श्रींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात येते. याच दिवशी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या व पारंपरिक पद्धतीने साजरा होणारा दिवजोत्सवही असतो. माले ही झुंबराच्या आकाराची दोन फूट उंचीची व तितक्याच रूदीची मातीची समई आहे.

त्याला सभोवार ५२ पणत्या असतात. जत्रेदिवशी हे पेटते माले 'मोड' (अवसर/संचार आलेला पुरूष) उचलून डोक्यावर घेतो व पारंपरिक पद्धतीने सर्व देवकृत्ये झाल्यावर सर्व महाजन भक्तांना कौल दिला जातो. या दिवशी सर्व सौभाग्यवती स्त्रिया सुहासिनी म्हणून दिवजा पेटवतात व पंचायतनातील सर्व मंदिरांना प्रदक्षिणा घालतात.

गोव्याबाहेर शेजारील महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात या देवीचे महाजन कुळावी आहेत व माल्याच्या जत्रेसाठी ते आवर्जून उपस्थित राहतात. कामत हळदणकर, चाटी हळदणकर, चारी, नाईक हळदणकर, कांबळी, वाघ, पंडित व जोशी असे सात वांगडी देवस्थानचे महाजन या जत्रौत्सवात उपस्थित राहतात.

नवरात्री विशेष (Navratri Celebration In Goa)

अश्विन शुद्ध प्रतिपदेला नऊ प्रकारच्या धान्याची पेरणी करून देवीच्या घटाची स्थापना केली जाते. याला 'रूजवण घालणे' असे म्हणतात. सकाळी सकाळी अभिषेक व पूजा, दुपारी महानैवेद्य व रात्री आरती असा कार्यक्रम असतो. दसऱ्याला शिबिकोत्सव असतो.

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Facebook

या दिवशी सकाळी देवीची षोडशोपचार पूजा केली जाते तसेच रवळनाथ व सिध्दनाथ या देवांची तरंगे सजवून पूजा करून ती देवस्थानात फिरवली जातात. तद्नंतर महाजनांना कौल प्रसाद दिला जातो व आरती व तीर्थप्रसाद होऊन या उत्सवाची सांगता होते.

कसे पोहोचाल? (How to reach Marcel?)

  • गोव्याची राजधानी पणजीहून हे देवस्थान ३७ मिनिटांच्या अंतरावर म्हणजेच १८ किमी आहे.

  • करमळी या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशनपासून हे ठिकाण २१ मिनिटे म्हणजेच १० किमीच्या अंतरावर आहे.

  • दाबोळी विमानतळापासून हे देवस्थान एका तासाच्या अंतरावर म्हणजेच ३४ किमी आहे.

  • मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळापासून हे देवस्थान सव्वा तासाच्या अंतरावर म्हणजेच ५० किमी आहे.

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan: ही देवी महिषासुरमर्दिनीच्या स्वरूपात असून तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेची मूर्ती व या देवीची मूर्ती एकसमान आहेत
Goa Navratri 2024: चालुक्य राजघराण्याच्या काळात बांधलेलं गोव्यातील सर्वात मोठं मंदिर

कुठे राहाल? (Where to stay in Marcel?)

  • देवस्थानच्या भक्तनिवासात फक्त भक्तमंडळींना खोली मिळते.

  • ओल्ड गोवा व पणजीपासून जवळ असल्याने या दोन्ही ठिकाणच्या चांगल्या व स्वस्त हॉटेल्समध्ये राहता येते. इथे रूम्स स्वस्तात उपलब्ध असतात.

हे करा (Do's)

  • देवळात जाताना अंगभर कपडे घालून जा

  • देवळात शांतता राखा

  • देवळात शिस्त पाळा

  • लहान मुलांना देवळात शिस्त पाळायला लावा

Shree Bhagwati Haldonkarin Devasthan Facebook

हे करू नका (Dont's)

  • स्त्रियांनी तोकडे कपडे घालून देवळात जाऊ नये.

  • मद्यपान मांसाहार मत्स्याहार किंवा कोणत्याही प्रकारचे अपेय पान करून जाऊ नये.

  • देवस्थान समितीच्या परवानगीशिवाय फोटोग्राफी वा व्हिडिओग्राफी करू नये.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com