Marcel Cricket League : माशेल क्रिकेट लिगमध्ये देवकीकृष्ण संघ विजेता

Marcel Cricket League : अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अम्बे पर्वतकर, शैलेंद्र वेलिंगकर, लक्ष्मण रायकर, मंगेश गावकर, विठ्ठल सुखठणकर,विकास भगत, रामचंद्र गावडे, सुदेश चोडणकर, चंद्रशेखर चोडणकर उपस्थित होते.
Marcel Cricket League 2024
Marcel Cricket League 2024 Dainik Gomantak

Marcel Cricket League :

खांडोळा, माशेल क्रिकेट लिग स्पर्धेचे विजेतेपद देवकीकृष्ण संघाला मिळाले. अंतिम सामन्यात देवकीकृष्ण संघाने लक्ष्मीनारायण संघाला ९ विकेटनी पराभव करून रोख पारितोषिक व आकर्षक चषक पटकावला. उपांत्य फेरीत पराभूत संघ विठोबा आणि ५ स्टार यांनापण बक्षिसे देण्यात आली.

अंतिम सामन्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून गोव्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू अम्बे पर्वतकर, शैलेंद्र वेलिंगकर, लक्ष्मण रायकर, मंगेश गावकर, विठ्ठल सुखठणकर,विकास भगत, रामचंद्र गावडे, सुदेश चोडणकर, चंद्रशेखर चोडणकर उपस्थित होते.

Marcel Cricket League 2024
Pallavi Dempo: मडकईतून 90 टक्के मतदान द्या, पल्लवी धेंपेंना निवडून आणा; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

अंतिम सामन्याचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात काम केल्याबद्दल लक्ष्मण रायकर, शिक्षण क्षेत्रातील विठ्ठल सुखठकर तर माजी खेळाडू रामचंद्र गावडे यांच्या यावेळी गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन दयानंद भगत यांनी केले तर स्वागत चंद्रशेखर चोडणकर, अरुण परब यांनी मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com