Watch Video: "पाऊण तास...", मंत्री ढवळीकरांनी सांगितला जुन्या मखराचा थरारक अनुभव; उलगडली कामाक्षी मंदिरातील अनोखी परंपरा

Minister Dhavalikar Makhar Experience: राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील कामाक्षी मंदिरातील त्यांचा अनुभव शेअर केला
Makharotsav old rituals Goa
Makharotsav old rituals GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Ponda Goa temple culture: घटस्थापनेने देशभरात नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून, गोव्यातही या उत्सवाची वेगळीच धूम पाहायला मिळत आहे. देशभरात गरबा-दांडियाचा प्रभाव वाढत असला तरी, गोव्याच्या नवरात्रीची खरी ओळख येथील मंदिरांमध्ये साजरा होणाऱ्या 'मखरोत्सवामुळे' आहे. हा मखरोत्सव विशेषतः फोंडा महालातील मंदिरांचे खास आकर्षण ठरला आहे.

परंपरेचा मान जपतोय 'मखरोत्सव'

पिढ्यानपिढ्या गोव्यात सुरू असलेली मखरोत्सवाची परंपरा आगळीवेगळी आहे. या परंपरेबद्दल बोलताना राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी फोंड्यातील कामाक्षी मंदिरातील त्यांचा अनुभव शेअर केला.

एका देवस्थानचा पुरोहित सदस्य म्हणून ही पवित्र जबाबदारी आपण वर्षांनुवर्षे कशी पार पाडत आहोत, हे त्यांनी सांगितले. लहानपणापासूनच मखरोत्सवात सक्रिय सहभाग असल्याचं सांगताना मंत्री म्हणाले, "माझा जन्म गोव्यात आणि खास करून फोंड्यात झाला याचा मला आनंद आहे."

मंदिरातील जुनं मखर खूपच जड होतं, मखर अंगावर ओढून घेत पुढे ढाळकणं प्रचंड त्रासदायक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे एखादा धडधाकट व्यक्तीच ते मखर हलवू शकायचा. "पाऊण तास माणूस न बदलता मखर हलवणं ही सोपी गोष्ट नाही," असेही ते म्हणाले.

'मखर' म्हणजे काय?

मंदिराच्या छताला लोखंडी साखळ्यांनी टांगलेली एक सुंदर लाकडी चौकट म्हणजे 'मखर'. ही चौकट रंगीत कागद, फुले आणि दिव्यांनी सजवली जाते. या मखरात देवी-देवतांची मूर्ती ठेवून चौघडा, ढोल, ताशांच्या गजरात वेगवेगळ्या तालावर हे मखर हलवले जाते आणि पुजाऱ्यांकडून आरत्या केल्या जातात.

Makharotsav old rituals Goa
Navratri in Goa: ना गरबा, ना दुर्गापूजा; नऊ प्रकारच्या धान्यांची पेरणी आणि मखरोत्सव; गोव्यातील नवरात्रीचं वेगळेपण काय?

नवरात्रीच्या नऊ रात्रींमध्ये हा उत्सव साजरा होतो आणि यात कीर्तन, संगीत, नृत्य तसेच पारंपरिक आरत्यांचे आयोजन केले जाते. हा उत्सव गोव्याच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग असून, तो आजही मोठ्या उत्साहात आणि श्रद्धेने साजरा केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com