
पणजी : थंडीचा महिना आला म्हणजे एका सणाची आपण खूप आतुरतेने वाट पाहू लागतो, तो म्हणजे मकर संक्रांत. तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं म्हणत आपण वर्षभराची कटुता विसरून नात्यांना नवीन सुरुवात करतो. आपल्या गोव्यात इतर ठिकाणांप्रमाणे पतंग उडवायची काही खास परंपरा नाही, तरीही सकाळी सुवासिनी महिलांकडून केलं जाणारं सुघट दान आणि संध्याकाळचं हळदीकुंकू फार महत्वाचं ठरतं.
सूर्य वर्षभरात बारा राशींमध्ये संक्रमणे करत असतो तरीही भारतीय लोकांच्या दृष्टीने मकर संक्रमणाला किंवा संक्रांतीला अधिक महत्त्व आहे. असं का? कारण या संक्रमणापासून सूर्याच्या उत्तरायणाला सुरुवात आणि भारतीयांना उत्तरायणामध्ये अधिक प्रकाश व उष्णता यांचा लाभ होतो आणि म्हणून आपल्याकडे संक्रांतीची जुनी परंपरा आहे. आता संक्रातीच्या सणाला काहीच दिवस बाकी आहेत, चला मग जाणून घेऊया यंदा कधी आहे मकर संक्रात.
सूर्य मकर राशीत प्रवेश करण्याचा हा पुण्यकाळ १४ तारखेला सकाळी ८:५५ मिनिटांनी सुरु होईल आणि सायंकाळी ४:५५ मिनिटांपर्यंत असेल. यंदाच्या संक्रातीला शास्त्रात नवे भांडे,गाईला घास, तीळ, लोकरीचे वस्त्र, तूप, पुस्तक, सोने दान द्यावे असे सांगितले आहे.
काही ठिकाणी संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नान आणि दान हे पुण्यदायी समजले जाते, म्हणूनच या सणाच्या दिवशी प्रयाग, गंगासागर अशा धार्मिक ठिकाणी प्रचंड मेळे भरतात. शास्त्रात या सणाच्या दिवशी पितृश्राद्ध करावे असेही सांगितले आहे. गोव्यात या दिवशी स्त्रिया मातीच्या घटाचे दान देतात, ज्याला सुघट दान असं म्हटलं जातं. या पूजेत एका घटात देवाला तीळ-तांदूळ अर्पण केले जातात आणि संक्रांतीनिमित्त सौभाग्यवाण दिले जाते.
खरंतर सणाच्या दिवशी कोणी काळे कपडे वापरात नाही, मात्र संक्रांत हा थंडीच्या दिवसांत येणारा सण असल्याने उबदारपणा मिळायला काळ रंग मदत करतो. शरीराला उब मिळते. एक पौराणिक कथा असंही सांगते की यादिवशी सूर्याने त्यांचा पुत्र शनी याला माफ केलं असल्याने शनिदेव याच दिवशी सूर्यनारायणाला भेटायला आले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.