"कधी नारद, कधी चार्ली चॅप्लिन, कधी श्रीकृष्ण"! गोव्यातले बापलेक जपताहेत 800 वर्षांची परंपरा; भांड-बहुरूपी कला

Lokotsav Goa 2026: ‘राष्ट्रीय लोकोत्सव-२६’ मध्ये सुप्रसिद्ध बहुरूपी कलाकार विक्रम भांड आणि त्यांचे वडील दुर्गा शंकर भांड हे करत असलेले आपल्या कलेचे सादरीकरण ही त्याची साक्ष आहे.
Lokotsav Goa 2026
Lokotsav Goa 2026Dainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या डिजिटल युगातील वेगवान आणि आधुनिक मनोरंजन माध्यमांच्या प्रभावात राजस्थानची ऐतिहासिक भांड (बहुरूपी) लोककला अजूनही आपला आत्मा आणि आपली परंपरा शाबूत ठेवून आहे, इतकेच नव्हे तर ती लोकांच्या हृदयावर राज्य करतानाही दिसते.

कला अकादमीच्या संकुलात चाललेल्या ‘राष्ट्रीय लोकोत्सव-२६’ मध्ये सुप्रसिद्ध बहुरूपी कलाकार विक्रम भांड आणि त्यांचे वडील दुर्गा शंकर भांड हे करत असलेले आपल्या कलेचे सादरीकरण ही त्याची साक्ष आहे. ही वंशपरंपरागत कला या महोत्सवात केवळ एक सादरीकरण म्हणून सामोरी येत नव्हती तर तिच्या रूपाने भारतीय लोकसंस्कृतीचा एक जिवंत वारसा साक्षात समोर सादर होत होता.

या पिता-पुत्रांच्या अनोख्या जोडीने संपूर्ण महोत्सवात त्यांच्या विविध रूपांनी आणि अभिनयाने आपली छाप टाकली. सर्व वयोगटातील प्रेक्षक त्यांच्या सादरीकरणाने खिळून जाताना दिसत होते. कधी नारद मुनींच्या वेशात ते समाजाला संदेश देत होते तर कधी भगवान शिव आणि भगवान कृष्णाचे रूप धारण करून श्रद्धेचा विषय बनत होते, कधी चार्ली चाप्लीन आणि जोकर बनवून हास्यही पसरवत होते. ही केवळ वेश बदलण्याची कला नव्हती तर अभिनयाची एक आगळी पद्धत होती. 

या कौटुंबिक परंपरेला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याचे श्रेय विक्रम भांड यांचे आजोबा, छगनलाल भांड यांना जाते. त्यांनी अमेरिका, लंडन, जपान, दुबई आदी देशांमध्ये या कलेचे सादरीकरण केले ज्यामुळे भारतीय भांड-बहुरूपी कलेला जागतिक ओळख लाभली.

Lokotsav Goa 2026
Goa Culture: गोव्यातील मूर्ती अर्पण करण्याची दुर्मिळ परंपरा आणि कृषी संस्कृतीचे महत्व; निसर्ग संस्कृतीतील टेराकोटा

एक काळ असा होता की गावांमध्ये बहुरूपी आल्याची बातमी ऐकताच गावातील मुले, स्त्री-पुरुष त्यांना पाहण्यासाठी जमा होत. या कलाप्रकाराला राजघराण्यांचा आश्रय लाभत होता.‌ विक्रम भांड यांचे कुटुंब उदयपूर दरबाराशी संबंधित आहे.

Lokotsav Goa 2026
Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

ही कला आमच्यासाठी केवळ एक व्यवसाय नाही तर ती आमची जीवनशैली आहे. हा वारसा आम्हाला पूर्वजांकडून मिळाला आहे आणि आमच्या भावी पिढ्यांपर्यंत त्याच शुद्धतेने पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आमच्या आजोबांनी आम्हाला हे शिकवले आहे की ही कला केवळ मंचीय सादरीकरण नाही तर ती तपश्चर्या आणि साधनेचा मार्ग आहे.

- विक्रम भांड

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com