Kanya Pujan 2025: नवरात्रीत देवीला प्रसन्न करण्याचा सर्वात सोपा मार्ग! 'या' चुका करू नका; वाचा कन्या पूजनाची तारीख, वेळ आणि योग्य पद्धत

Kanya Pujan 2025 muhurat: या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्याचसोबत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे
Kanya Pujan rules
Kanya Pujan rulesDainik Gomantak
Published on
Updated on

Navratri Kanya Puja date: हिंदू धर्मात नवरात्रीला अत्यंत पवित्र मानले जाते. यावर्षी शारदीय नवरात्री २२ सप्टेंबरपासून सुरू झालाय २ ऑक्टोबरला विजयादशमीने त्याची सांगता होईल. या नऊ दिवसांत देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्याचसोबत कन्या पूजनाचे विशेष महत्त्व आहे.

धार्मिक मान्यतेनुसार, कुमारिकांमध्ये देवी दुर्गा वास करते, म्हणून नवरात्रीत त्यांचे पूजन करण्याची परंपरा आहे. अनेक साधक संपूर्ण नऊ दिवस कन्या पूजन करतात, तर काही भक्त विशेषतः महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी हे पूजन करतात. यावर्षी महाअष्टमी आणि नवमीच्या तिथीबद्दल लोकांमध्ये संभ्रम आहे. त्यामुळे, कन्या पूजनासाठी शुभ तिथी आणि मुहूर्त जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

महाअष्टमी आणि महानवमीची योग्य तारीख

हिंदू पंचांगानुसार, आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी २९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ४:३१ वाजता सुरू होईल आणि ३० सप्टेंबर रोजी संध्याकाळी ६:०६ वाजता संपेल. त्यामुळे, महाअष्टमीचे व्रत आणि पूजन ३० सप्टेंबर, २०२५ रोजी केले जाईल. अष्टमी तिथी संपल्यानंतर लगेचच नवमी तिथी सुरू होईल, जी १ ऑक्टोबर रोजी रात्री ७:०१ वाजेपर्यंत असेल. त्यामुळे, महानवमीचे पूजन १ ऑक्टोबर, २०२५ रोजी केले जाईल.

Kanya Pujan rules
Navratri Special: एका घराच्या गच्चीवर सुरु केलेले काम, पोचले हजारो मुलांपर्यंत! ‘रोबोटिक्स’ची ‘अ,आ,ई..’ शिकवणारी आधुनिक दुर्गा

कन्या पूजनासाठी शुभ मुहूर्त

शास्त्रानुसार, नवरात्रीमध्ये महाअष्टमी आणि महानवमीच्या दिवशी कन्या पूजन करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी पूजन केल्याने देवी दुर्गा खूप प्रसन्न होते आणि भक्तांवर आपली कृपा करते.

महाअष्टमीसाठी शुभ मुहूर्त (३० सप्टेंबर, २०२५):

सकाळचा मुहूर्त: सकाळी १०:४१ ते दुपारी १२:११ पर्यंत.

अभिजीत मुहूर्त: सकाळी ११:४७ ते दुपारी १२:३५ पर्यंत.

महानवमीसाठी शुभ मुहूर्त (१ ऑक्टोबर, २०२५):

ब्रह्म मुहूर्त: पहाटे ४:३७ ते ५:२६ पर्यंत.

सकाळचा मुहूर्त: सकाळी ५:०१ ते ६:१४ पर्यंत.

रवि योग: सकाळी ८:०६ पासून २ ऑक्टोबरच्या पहाटे ६:१५ पर्यंत.

कन्या पूजनासाठी १ ते १० वर्षांच्या कुमारिकांना बोलावणे सर्वात शुभ मानले जाते. प्रत्येक वयाच्या कन्येच्या पूजनाचे वेगवेगळे महत्त्व आणि पुण्य सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com