Assagao Top Hotels: आसगावातील जगप्रसिद्ध हॉटेल्स तुम्हाला माहितीयेत का? पर्यटकांना पाडतात भुरळ; अस्सल चवीची अस्सल मेजवानी मिळते

Goa Tourism: आसगाव गाव हे शांतताप्रिय व निसर्ग सानिध्यात असलेले इवलेसे गाव. याच वातावरणात, अनेक लौकिकप्राप्त हॉटेल्स आहेत.
Assagao Top Hotels: आसगावातील जगप्रसिद्ध हॉटेल्स तुम्हाला माहितीयेत का? पर्यटकांना पाडतात भुरळ; अस्सल गोवन मेजवाणीचा मिळतो तडखा!
Assagao Top HotelsDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: गोवा हे जगभरातल्या निसर्गप्रेमींना रिफ्रेश करणारे पर्यटनस्थळ आहे. परिणामी, वर्षाचे बाराही महिने राज्यात पर्यटकांची मोठी वर्दळ असते. गोव्यातील मंदिरे, चर्च यांचा सांस्कृतिक वारसा जितका प्रिय आहे, तितकीच गोमंतकीय खाद्यसंस्कृती पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. देशातील काही महत्त्वाच्या हॉटेलमध्ये समावष्ट असलेल्यांपैकी बार्देशात शिवोली मतदारसंघातील आसगावात काही लौकिकप्राप्त रेस्टॉरंट्स आहेत.

तिथे अत्यंत श्रीमंत पर्यटकांची (Tourists) नेहमीच उठबस असते. याचे मुख्य कारण म्हणजे, याठिकाणी येणारा ग्राहक हा सभ्य, उच्चभ्रू असतो. ज्याला जास्त प्रमाणात हॉटेल शिष्टाचाराची जाणीव व ते निसर्गरम्य शांत वातावरण अधिक पसंत करतात. आणि हे सुख केवळ आसगाव यासारखे नयनरम्य वातावरणातील रेस्टॉरंट्स पर्यटकांना देतात.

विदेशींनाही ‘बावरी’ची भुरळ

बावरी हे देशातील एका प्रख्यात शेफचे रेस्टॉरंट आहे. फ्लोटिंग रेस्टॉरंट अशी याची ओळख. या रेस्टॉरंटचे अ‍ॅम्बियन्स हे अप्रतिम असून, अधिकतर उच्चभ्रू व श्रीमंत टुरिस्टच याठिकणी येणे पसंत करतात. विशेषतः विदेशी पर्यटकांना याची जास्त भुरळ आहे. कारण, विदेशींना सभ्य गर्दी व शांत वातावरण जास्त आवडते. येथील सौम्य संगीत, आल्हाददायक प्रकाशयोजना अन् वातावरण वेगळाच माहौल तयार करते. या रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टपासून जेवण, व सायंकाळी डिनरसाठी मोठी गर्दी उसळते. अधिकतर उत्तर भारतीय व विदेशी लोकांची उठबस असते.

Assagao Top Hotels: आसगावातील जगप्रसिद्ध हॉटेल्स तुम्हाला माहितीयेत का? पर्यटकांना पाडतात भुरळ; अस्सल गोवन मेजवाणीचा मिळतो तडखा!
Goa Tourism: परदेशी पाहुण्यांना गोव्याची भुरळ; दरवर्षी लाखो पर्यटक देतात भेट, काय असेल कारण?

नामांकीत रेस्टॉरेंटसचे नेत्रसुखद ॲम्बियन्स

आसगाव (Assagao) गाव हे शांतताप्रिय व निसर्ग सानिध्यात असलेले इवलेसे गाव. याच वातावरणात, अनेक लौकिकप्राप्त हॉटेल्स आहेत. ज्यामध्ये बावरी, विनायक फॅमिली रेस्टॉरंट, गोवन स्पाईस, दी आसा हाउस, इझुमी आदींचा हमखास उल्लेख होतो. या रेस्टॉरंट्सची खासियत येथील सुखद अ‍ॅम्बियन्स.

Assagao Top Hotels: आसगावातील जगप्रसिद्ध हॉटेल्स तुम्हाला माहितीयेत का? पर्यटकांना पाडतात भुरळ; अस्सल गोवन मेजवाणीचा मिळतो तडखा!
Goa Tourism: 'रोजगार निर्मितीत पर्यटन व्यवसायाचे मोठे योगदान'! मंत्री फळदेसाई यांचे प्रतिपादन

‘विनायक’मध्ये बारमाही गर्दी

विनायक रेस्टॉरंट्स नेहमी हाउसफुल्ल असते. अनेकजण आगाऊ बुकिंग करतात. विनायक फॅमिली रेस्टॉरंटमध्ये फिश-थाळीसाठी लोकांची झुंबड उडते. इथे अनेकजण टेबल रिक्त होण्याची प्रतीक्षा करतात. यावरूनच हॉटेलच्या चवीचा अंदाज बांधता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com