Goa Arts & Literature Festival: रंगत 'गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल'ची! गोमंतकीय रसिकांना मिळणार समृद्ध अनुभव; जाणून घ्या डिटेल्स

Goa Arts and Literature Festival 2025: गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल’ (GALF)ची १३वी आवृत्ती इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस साजरी होणार आहे.‌
Goa Arts & Literature Festival: रंगत 'गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल'ची! गोमंतकीय रसिकांना मिळणार समृद्ध अनुभव; जाणून घ्या डिटेल्स
Goa Arts & Literature FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल’ (GALF)ची १३वी आवृत्ती इंटरनॅशनल सेंटर ऑफ गोवा येथे १३ ते १५ फेब्रुवारी असे तीन दिवस साजरी होणार आहे.‌ प्रत्येक महोत्सवादरम्यान, त्यात सहभागी होणारे नामवंत लेखक आणि कवी साहित्य रसिकांना समृद्ध करणारे अनुभव देत आले आहेत. 

फेब्रुवारी 13 रोजी संध्याकाळी 5 वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होईल. प्रसिद्ध कवयित्री, लेखिका सुमाना रॉय तसेच नामवंत लेखिका, अनुवादिका आणि पत्रकार शांता गोखले या समारंभात प्रमुख वक्त्या असतील. उद्‌घाटन समारंभात चित्रकार सोनिया रॉड्रिगीज  सबरवाल यांनी चित्रांकित केलेल्या 'गाल्फ' कलाकृतीचे अनावरण होणार आहे. महोत्सवाच्या या पहिल्या दिवशीच्या सत्रात गोव्याचे (Goa) प्रसिद्ध कवी रमेश घाडी आपल्या कविता सादर करतील तर त्यानंतर 'द गोल्डन रोड: हाऊ एन्शियंट इंडिया ट्रान्सफॉर्म्ड द वर्ल्ड'  या पुस्तकावर होणार्‍या विशेष चर्चात्मक कार्यक्रमात या पुस्तकाचे लेखक विलियम डॅलरिम्पल यांच्याशी डॉ. विद्या देहेजिया या संवाद साधतील. 

प्रसिद्ध कवी, लेखक आणि विचारवंत यांच्याशी भेट घडवून आणणाऱ्या या महोत्सवात पुस्तक प्रकाशन, कविता सत्रे, विचारांना चालना देणाऱ्या चर्चा, विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा यासारख्या कार्यक्रमांचाही समावेश आहे. हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.

Goa Arts & Literature Festival: रंगत 'गोवा आर्ट्स अँड लिटरेचर फेस्टिवल'ची! गोमंतकीय रसिकांना मिळणार समृद्ध अनुभव; जाणून घ्या डिटेल्स
Serendipity Arts Festival Goa 2023: दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या आर्ट्स फेस्टिव्हलच्या तारखा जाहीर; पणजीत आयोजन

'मोराचे पीस हातात धरून डौलात बसलेली कला आणि साहित्याची देवता खोल चिंतन करत आहे. देवीचे हे रूप संत कबीर यांच्या 'झिनी झिनी रे बिनी चदरिया' भजनाचे प्रतीक आहे. या ओळी मानवी शरीराबद्दल बोलतात- तरल, नाजूकपणे विणलेले हे नाजूक वस्त्र इंगळा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडी या नसांनी गुंफून आठ कमळ चक्रांमधून वळसा घेत आहे.‌ देवीचे स्वरूप हे पाच घटकांचे मूर्त रूप आहे, जे कलात्मकरित्या प्रस्तुत केले गेले आहे- पृथ्वी, पाणी, हवा आणि अवकाश तर तिचे तेजस्वी प्रभामंडल अग्नीचे प्रतीक आहे. तिच्या दैवी अस्तित्वाला अबोलीच्या फुलांचा साज दिला गेला आहे. गोवा राज्याचे हे फुल तिच्या तेजाला स्वर्गीय सौंदर्य बहाल करत आहे.'

चित्रकार सोनिया रॉड्रिगीज सबरवाल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com